Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. या जगात अशी एकही व्यक्ती नसेल की, ज्याच्या शाळेशी जोडलेल्या काही आठवणी नसतील. शाळेतल्या गोड गमतीजमती आणि मित्र-मैत्रिणी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. मात्र, शाळेनंतरच्या आयुष्यात हे मित्र वा मैत्रिणी दुरावतात. मग अनेकदा त्यांची कधी भेटही होत नाही. हल्ली सोशल मीडियाच्या वापरामुळे कित्येकांना आता याच जुन्या मित्र-मैत्रिणींशी पुन्हा संपर्क साधणे शक्य होऊ लागले आहे. दरम्यान, आता एका शाळेतील गेट टुगेदरमधील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्यात एक तरुण आपल्या शिक्षकांसमोर जबरदस्त डान्स करताना दिसतोय.
सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होतात. कधी शिक्षक विद्यार्थ्यांना तालासुरात कविता शिकवताना दिसतात; तर कधी शिक्षिका मुलांसोबत डान्स करताना दिसतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुण आपल्या शाळेतील गेट टुगेदरमध्ये मराठी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेतील मोठ्या हॉलमध्ये सर्व शिक्षक जमले असून, यावेळी त्यांच्यातील एक जण सुंदर लावणी सादर करतो. यावेळी तो तरुण विचार काय हाय तुमचा ही लावणी सादर करतो. त्याची लावणी करण्याची पद्धत आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून सर्व जण अवाक् झाल्याचे दिसते.
हेही वाचा: “जीवन-मरणाचा खेळ…” हरणाची शिकार करण्यासाठी बिबट्याचा अनोखा डाव; Viral Video एकदा पाहाच
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ यूट्यूबवरील @rajdancer2021 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत जवळपास १२ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने लिहिलेय, “खूप मस्त. सगळ्या उपस्थितांना नमस्कार. खूप सकारात्मक वातावरण आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलेय, “लावणी तर अप्रतिम; पण त्याहीपेक्षा तुझा आत्मविश्वास… सलाम.” आणखी एकाने लिहिलेय, “गौतमी पाटील फेल आहे तुमच्यापुढे.” आणखी एकाने लिहिलेय, “अरे दादा, कसला भारी डान्स करतोस.”