Viral Video: स्पर्धा परीक्षेतील काही अडघड परीक्षांमध्ये MPSC, UPSC या परीक्षांचा आवर्जून उल्लेख केला जातो. या परीक्षा कितीही अवघड असल्या तरीही या परीक्षा देण्यासाठी लाखो विद्यार्थी मेहनत घेतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थी MPSC परीक्षेची तयार करतात. यातील काही विद्यार्थी लवकर पास होतात तर काही विद्यार्थ्यांना पास होण्यास अनेक वर्ष संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या परीक्षा देणाऱ्या काही विद्यार्थांची अनेक जण खिल्ली उडवतात, त्यांना टोमणे मारतात. बऱ्याचदा या परीक्षेच्या अभ्यासाच्या नादात तरुणांच्या आयुष्यातील अनेक वर्ष निघून जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण MPSC च्या तरुणांची व्यथा गाण्याच्या माध्यमातून सांगताना दिसत आहे.
MPSC विद्यार्थ्यांबाबत अनेक मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यावरून या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची खिल्ली उडवली जाते, त्यांची मस्करी केली जाते. या परीक्षेचा अभ्यास करून वेळ वाया न घालवण्याचे सल्ले दिले जातात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असाच एक तरुण गाण्याच्या माध्यमातून त्याचे दुःख मांडताना दिसतोय.
तरुणाने गायलं MPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी गाणं (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण डोळ्यांवर गॉगल लावून गाणं गाताना दिसतोय. यावेळी तो गात असलेलं हे गाणं ‘गुलाबी साडी’ या गाण्याच्या तालावर गात आहे. या तरुणाचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओवर, “MPSC चा अभ्यास करून एक वैतागलेले भावी अधिकारी, त्यांचं मन मोकळं करताना”, असं लिहिण्यात आलं आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mpsc_short_notes या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर साठ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “रोज १२ तास केलेला अभ्यास अजिबात वाया जात नाही भावा”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “रिव्हिजन करून कंटाळा आलाय”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “रिव्हिजन करून कंटाळा आलाय”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “भावा जबरदस्त टॅलेंट आहे तुझ्यात.”