Young woman attempted suicide: आयुष्यातील प्रत्येक दिवस सारखा नसतो. कधी आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येतात तर कधी एकामागे एक अनेक दुःख येतात. पण, एक माणूस म्हणून आलेल्या प्रत्येक संकटावर मात करणं महत्त्वाचं आहे. दुःखात दिवस-रात्र होरपळणारीच माणसं एक दिवस यशाचे शिखर पार करतात. पण, त्यासाठी संयम राखणं महत्त्वाचं असतं. मात्र, अनेकदा काही जण आलेल्या दुःखावर मात करण्यास स्वतःला असमर्थ ठरवतात आणि जीवाचं काहीतरी बरं-वाईट करण्याचा विचार करतात. माणसाचा जन्म मिळणंही खूप मोठी गोष्ट आहे, हे बहुदा ते विसरून जातात. सोशल मीडियामुळे आजपर्यंत तुम्ही आत्महत्या करणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले पाहिले असतील. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आजकालचे तरुण-तरुणी काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाही की लगेच चिडचिड करतात, नाराज होतात. ज्यात कधी मनासारखी नोकरी किंवा कॉलेज न मिळणे किंवा आवडीच्या व्यक्तीकडून प्रेमात धोका किंवा नकार मिळणे अशा विविध गोष्टी असतात. परंतु, या सर्व गोष्टी आयुष्याचा भाग आहेत, त्या विसरून जाणं सहज शक्य नसलं तरीही अशक्य अजिबात नाही. यासाठी स्वतःच्या पालकांचा विचार न करता अनेक जण आत्महत्या हा पर्याय निवडतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणीही हेच करताना दिसतेय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी प्लॅटफॉर्मवर उभी असून यावेळी ट्रेन येण्याची वाट पाहते आह, जशी ट्रेन येताना दिसते तशी ती रूळावर उडी मारण्यासाठी पळत जाते. इतक्यात तिच्या मागे उभी असलेली एक तत्पर व्यक्ती तिचा हात पकडते आणि तिला उडी मारण्यापासून रोखते. या झटापटीत ते दोघेही प्लाटफॉर्मवर पडतात, इतक्यात ट्रेन त्यांच्या जवळ येताना दिसताच आसपासचे काही लोक धावत येऊन त्यांना बाजूला करतात. अशाप्रकारे त्या व्यक्तीमुळे तरुणीला आत्महत्या करता येत नाही.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर युट्यूबवरील @CCTV या अकाउन्टवर शेअर करण्यात आला असून आतापर्यंत लाखो व्ह्युज आले असून अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “वाचवणाऱ्याचं डोकं जमिनीला किती जोरात आदळले दुसऱ्याला वाचवताना”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मागे उभे राहिलेले लोक काय वाट बघत होते का?”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “असं नका रे करू, एकदा आई-बापाचा विचार करा… राग आला दोन दिवस एकांतात शांत बसा, जवळच्या व्यक्तींकडे मन मोकळं करा… पण, जीव नका रे देऊ… हे जीवन असंच आहे, सुखाच्या मागे दुःख लपलेलं असत… ते चक्र चालत राहतं…”