Viral Video: सध्या देशातील बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठणे, पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उद्भवू लागल्या आहेत. या दिवसात सोशल मीडियावर प्राण्यांचे विविध व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. बऱ्याचदा माणसांप्रमाणे प्राणीदेखील पुराच्या पाण्यात अडकतात, वाहून जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका श्वानाचे पिल्लू वाहून जाताना दिसत आहे.
आपल्या घरातील व्यक्तींइतकाच घरातील पाळीव प्राण्यांवरही लोकांचा खूप जीव असतो. मांजर असो किंवा श्वान, लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम करतात, त्यांना जीवापाड जपतात; शिवाय त्यांच्या आजारपणात त्यांची काळजी घेतात. पण, असेदेखील अनेक लोक असतात, जे स्वतःच्या स्वार्थासाठी प्राण्यांचा गैरवापर करतात. असे लोक व्हिडीओसाठी आणि रील्स बनवण्यासाठी कोणत्याही थराला जातात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका तरुणीने रील बनवण्यासाठी एका श्वानाच्या पिल्लाचा जीव धोक्यात घातल्याचे दिसत आहे.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
हा व्हायरल व्हिडीओ एका नदीतील असून यावेळी नदीला पूर आल्याचे दिसत आहे. पूर परिस्थितीतदेखील यावेळी एक तरुणी तिच्या श्वानाला घेऊन पाण्यात उभी राहते. तेवढ्यात एक मोठी लाट येते आणि पाण्याच्या प्रवाहाने श्वानाचे पिल्लू वाहून जाते; तरुणी पटकन पळत जाते आणि श्वानाच्या पिल्लास वाचवते. पण, हे सर्व फक्त एक व्हिडीओ काढण्यासाठी घडवण्यात आले होते. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून अनेक जण तरुणीच्या कृत्यावर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @tlatoani_pizzatl या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत २७ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘श्वानाची दादागिरी…’ चक्क चालू रिक्षाच्या टपावर थाटात बसला; VIDEO पाहून पोटधरून हसाल
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “पप्पांची परी काहीही करू शकते”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “मला वाटतंय या मुलीने फक्त व्हिडीओसाठी हे केलं असावं”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “हिचा मेंदू श्वानापेक्षा लहान आहे”; तर आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “एवढ्या पाण्यात जायची काय गरज होती?”
दरम्यान, यापूर्वीदेखील पुरात अडकलेल्या प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यातील एका व्हिडीओमध्ये हत्तीचे पिल्लू पुराच्या पाण्यात अडकलेले दिसले होते, ज्याला वनाधिकाऱ्यांनी वाचवले होते.