Viral Video: श्वान आणि मांजर हे अनेकांचे लाडके प्राणी आहेत. अनेक जण या प्राण्यांना आपल्या घरात आवडीने पाळतात. लोकांचे त्यांच्या या पाळीव प्राण्यांवर खूप प्रेम असते. या पाळीव प्राण्यांना अनेकदा घरातील सदस्यांइतकीच उत्तम वागणूक दिली जाते. त्यांचे खूप लाड केले जातात. शिवाय त्यांचे वाढदिवसदेखील आवडीने साजरे केले जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात, मात्र आता असा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी श्वानाबरोबर गंमत करता करता तिच्याबरोबरच असं काहीतरी होतं. जे पाहून युजर्स समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.

जगात जसे प्राणीप्रेमी असतात, तसे अनेक जण प्राण्यांचा तिरस्कारही करताना दिसतात. प्राण्यांना मारहाण करणारे, प्राण्यांवर अत्याचार करणाऱ्या लोकांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. लहान मुलं आणि प्राण्यांचीदेखील खूप चांगली मैत्री असते, पण काही खोडकर मुलं विनाकारण प्राण्यांना त्रास देताना दिसतात. या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी तिच्या श्वानाला हातात घेऊन एका तलावाजवळ उभी राहते आणि अचानक तिच्या हातातल्या श्वानाला समोरच्या तलावात फेकण्याचा प्रयत्न करते. पण, श्वानाचे नशीब चांगले म्हणून त्याच्याऐवजी तरुणी स्वतःच तलावात पडते. सुरुवातीला तरुणी श्वानाला तलावात फेकणार होती, पण त्याच्याऐवजी ती स्वतःच पडल्याने युजर्स अनेक कमेंट्स करून तरुणीवर हसताना दिसत आहेत. तसेच, तुला लगेच कर्माचे फळ मिळाले असंदेखील म्हणत आहेत.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ @vines_da_addaa या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तसेच हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. यावर नेटकरीदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: स्वतःच्या जीवाशी खेळ; पूर आलेल्या नदीच्या पाण्यात तरुण मारतोय स्टाईल, VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर एका युजरने लिहिलंय की, “कर्माचे फळ लगेच मिळते.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “हिला असंच पाहिजे, हॅप्पी जर्नी ताई”, तर तिसऱ्या एकाने लिहिलंय की, “देव सर्व काही बघतो”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “विकृत लोकांना असंच पाहिजे.”

Story img Loader