पाण्यात पोहायला अनेकांना आवडते. तलावात, विहीरीत किंवा नदीत पोहण्यापेक्षा प्रचंड मोठ्या समुद्रात पोहायला अनेकांना आवडते. पाण्यातील जग पाहण्यासाठी, तेथील अनुभव जवळून घेण्यासाठी काहीजण ‘अंडरवॉटर डायविंग’ करतात. त्यासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. अनेकदा अशावेळी जलचर प्राण्यांमुळे अनपेक्षित घटना घडतात. तर काही वेळा शार्कसारख्या महाकाय माश्याची शिकार झाल्यास जीव देखील गमवावा लागू शकतो. अशा धक्कादायक घटनांचे व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी ‘ अंडरवॉटर डायविंग’ करण्यासाठी बोटीतून पाण्यात जाण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. ती उडी मारणार इतक्यात तिला पाण्यात काहीतरी हालचाल होत आहे असे जाणवते. तिथे पाहताच तो शार्क मासा असल्याचे तिच्या लक्षात येते, ती मागे होणार इतक्यात शार्क पाण्यातून बाहेर येत हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. सुदैवाने तरुणीने वेळीच पाण्यात हालचाल पहिल्याने आणि लगेच मागे बोटीवर आल्याने तिचा जीव वाचतो. पाहा व्हायरल व्हिडीओ.
आणखी वाचा: काळ आला होता पण…; व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रांनी दिला मोलाचा सल्ला, म्हणाले ‘यासाठी कृतज्ञता…’
व्हायरल व्हिडीओ:
काही सेकंदाच्या अंतराने या तरुणीचा जीव वाचल्याचा हा थक्क करणारा व्हिडीओ अंगावर शहारा आणणारा आहे. ही अनपेक्षित घटना पाहून नेटकरीही अवाक झाले आहेत. अनेकांनी कमेंट्समध्ये अशावेळी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. या व्हिडीओला १५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.