बर्गर खाणं कोणाला नाही आवडणार? लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना चमचमीत खाण्याचं तुफान आकर्षण असतं. दरवर्षी ‘ आता या वेळी जिमला जायचं हं!’ वगैरे म्हणत न्यू ईयर रेझोल्युशन करणारे २ जानेवारी उजाडताच ‘थोडं चालतं’ वगैरे म्हणत बर्गर आणि पिझ्झावर ताव मारताना दिसतात.
त्या बर्गरचेही किती प्रकार? खुसखुशीत पाव मग त्यावर तो चटकदार साॅस, आपल्या आवडीनुसार चिकन किंवा पनीर पॅटी आणि त्यावर मस्त चीज आणि सॅलड अशा सगळा जामानिमा असल्यावर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. यासोहत कोक किंवा पेप्सीचा कॅन असला तर काय मजा!
भूक लागलेली असताना असं वर्णन एेकून सगळ्यांची भूक चाळवते. पण काहीही झालं तरी तुम्ही किती बर्गर्स खाल एकावेळी? दोन? फार फार तर चार? आणि तेसुध्दा किती वेळामध्ये? गप्पागोष्टी करत एक तासभर तरी लागेल. पण एका मिनिटात तुम्ही किती बर्गर्स खाल?
आता हा पुढचा व्हिडिओ पहा या व्हिडिओमधल्या डावीकडच्या मुलाने एका मिनिटात पाच बर्गर्स खात ‘गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड्समध्चे जागा पटकावली आहे. पाहा व्हिडिओ
सौजन्य- यूट्यूब
या व्हिडिओमध्ये डावीकडे बसलेल्या मुलाने हा वर्ल्ड रेकाॅर्ड केला आहे. या मुलाचं नाव आहे रिकार्डो. २४ वर्षाच्ा रिकार्डोने मिनिटभरात पाच बर्गर्सचे बकाणे कोंबले. यातला प्रत्येक बर्गर कमीतकमी शंभर ग्रॅमचा होता. आता शंभर ग्रॅम कमी वाटत असले तरी शंभर ग्रॅम बर्गर खाणं हा प्रकार फार कठीण असतो. या व्हिडिओमध्ये आपण लक्षपूर्वक पाहिलं तर या ‘स्पर्धकांना’ बर्गरसोबत कोल्डड्रिंक प्यायची मुभा होती पण तरीही मिनिटाला पाच बर्गऱ हा प्रकार अचाटच आहे.
पाच बर्गर खाणाऱ्या रिकार्डोची दुसऱ्या दिवशी कोणी मुलाखत घेतली होती का हे स्पष्ट झालेलं नाही पण सध्या हा विचार बाजूला ठेवत वर्ल्ड रेकाॅर्ड होल्डरचं अभिनंदन करूयात.