आपल्या फिटनेससाठी चर्चेत असलेल्या डच यूट्यूबर्सच्या जोडीने हेलिकॉप्टरला लटकत असताना एका मिनिटात सर्वाधिक पुल-अप करण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. एका अहवालानुसार, नेदरलँडमधील स्टॅन ब्राउनी आणि अर्जेन अल्बर्स या युटूबर जोडीने ६ जुलै २०२२ रोजी बेल्जियममधील अँटवर्प येथील होवेनन एयरफील्ड येथे नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, अर्जेनने स्थिर हेलिकॉप्टरवर हवेत २४ पुल-अप केले. त्याने रोमन सहराडियनचा यापूर्वीचा २३ पुल-अप्सचा विक्रम मोडला. मात्र, नंतर स्टॅन ब्रुइनिंकने एका मिनिटात २५ पुल-अप करत अर्जेनचा रेकॉर्ड आपल्या नावावर केला. याचा एक व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने आपल्या यूट्यूब हँडलवर शेअर केला आहे.

Commonwealth Games 2022: सुवर्ण-रौप्य पदक खरंच सोने आणि चांदीचे असतात का? जाणून घ्या, मेडल्स बनवण्यामागची गोष्ट

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, जागतिक विक्रमासाठी सराव करण्यासाठी दोन खेळाडूंना हेलिकॉप्टर शोधण्यास १५ दिवस लागले. यासाठी दोघांनी खूप सराव केला. अर्जेन अल्बर्स आणि स्टॅन ब्राउनी ही जोडी आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी नेहमीच खूप जागरूक असते.

यूट्यूबवरील त्यांचे व्हिडीओ अनेकांना आवडतात. ते वेगवेगळे स्टंट्स करून त्यांचे व्हिडीओ बनवत राहतात आणि ते यूट्यूबवर टाकतात. दर्शक ते व्हिडीओ पाहतात आणि त्यावर प्रतिक्रिया देखील देतात. हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी दोन्ही युटूबर्सनी कित्येक आठवडे तयारी केली होती.

ब्राउनी कॅलिस्थेनिक्समध्ये तज्ञ आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सांगितले की या दिवशी, त्याने अपवादात्मकरित्या चांगली कामगिरी केली आणि २५ पुल-अपसह जागतिक विक्रम आपल्या नावावर केला.

Story img Loader