Zomato Women Food Delivery Agent Viral Video : फूड डिलिव्हरी एजंटचे भावनिक आणि प्रेरणादायी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याच मालिकेत आता एका महिला फूड डिलिव्हरी एजंटचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक तिच्या धाडसाला सलाम करत आहेत. खरं तर, व्हायरल व्हिडीओमध्ये झोमॅटोची ही महिला फूड डिलिव्हरी एजंट तिच्या दोन लहान मुलांसोबत दुपारी फूड डिलिव्हरी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ लोकांच्या हृदयाला भिडला आहे. काही लोक भावूकही झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही वर्किंग वुमनला घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना प्रत्येक दिवशी तारेवरची कसरत करावी लागते. घरातली कामं, मुलांची दुखणीखुपणी, ज्येष्ठांचं आजारपण, पाहुणे असं सगळं सांभाळत नोकरीतही आपली जागा टिकवून ठेवणं याला कमालीचं कौशल्य लागतं. अशी जिद्द दाखवून आपल्या छोट्याश्या मुलीला पोटाशी घेऊन फूड डिलिव्हरीचं काम करणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण फूड ब्लॉगर सौरभ पंजवानी झोमॅटोच्या महिला डिलिव्हरी एजंटशी बोलतांना पाहू शकतो. या महिलेने तिच्या पाठीवर झोमॅटो बॅग आणि पुढच्या बाजूला बाळाची बेबी कॅरियर बॅग लटकवली आहे.

आणखी वाचा : सत्तेची ‘नशा’! किरकोळ गोष्टीवरून मुख्यमंत्र्यांच्या मुलीने डॉक्टरला मारली चपराक, CM नी मागितली माफी

राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या पाठीवर बाळाला बांधून इंग्रजांविरुद्ध लढा दिला. अशीच एक राणी लक्ष्मी जी आपल्या लहान बाळाला पोटाशी बांधून फूड डिलिव्हरीची जबाबदारी पार पाडत आहे. हे पाहून ब्लॉगरचे सुद्धा हृदय पिळवटून गेले आणि त्याने तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेचा मुलगाही तिच्यासोबत होता. व्हिडीओमध्ये ती महिला सांगते की ती दिवसभर उन्हात तिच्या मुलांसोबत असे फूड डिलिव्हरी करते. ही झोमटो महिला फूड डिलिव्हरी एजंट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलीय.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ही बटालियन आहे की संपूर्ण सेना? शेकडो बदक रस्त्यावर सैन्यासारखे कूच करू लागले, ट्रॅफिकच थांबवली!

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर foodclubbysaurabhpanjwani नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ब्लॉगरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे पाहून मला खूप प्रेरणा मिळाली. झोमॅटोचा ही डिलिव्हरी एजंट संपूर्ण दिवस दोन मुलांसोबत उन्हात घालवते. यावरून आपण शिकले पाहिजे की एखादी व्यक्ती इच्छा असेल तर काहीही करू शकते.

आणखी वाचा : गोळीबारात स्वसंरक्षण कसं करायचं याचं मुलाला ट्रेनिंग देणाऱ्या आईचा VIDEO VIRAL, एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : मित्राने केली नको ती मस्करी! नवरदेव खवळला अन् लग्नमंडपातच सुरू झाली मारामारी

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला ७.९ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ मिलियन लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. हा व्हिडीओ एक महिला सशक्तीकरणाचे दर्शन घडवत आहेत. लोक या व्हिडीओवर महिलेचं कौतुक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video zomato delivery partner carries his kids to work internet calls him real hero prp