Ganpati bappa murti on T20 world cup theme : मुंबईत गणपतीचा उत्सव थाटात होत असतो. उंच गणेशमूर्ती आणि भव्यदिव्य सजावट हे मुंबईतील गणेशोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं. सर्वांनाच बाप्पाच्या भेटीची ओढ लागली आहे. यंदा ७ तारखेपासून गणपती उत्सव सुरू होईल आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाचं विसर्जन होईल. दहा दिवसांचा हा उत्सव सर्वांसाठी खूप खास असतो. वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मुंबईतील गणेश आगमन सोहळे सुरू झाले आहे. यावर्षी प्रत्येक मंडळ काहीतरी आगळे वेगळे करत आहे, त्यामुळे यंदा गणेश उत्सवाला अधिकच रंगत आली आहे. अशातच एका गणपती बाप्पाची मूर्ती सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. गणेशोत्सवासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल झालेला आहे, ज्यात गणपती बाप्पाची सर्वांच्या आवडीच्या थीमची मूर्ती पाहायला मिळतेय.

मुंबईतली मंडळं नेहमीच काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न करत विविध पद्धतीच्या थीमही ठेवतात. अशाच एका मंडळानं गणपती बाप्पाची मूर्ती ही ‘टी-२० वर्ल्ड कप’च्या थीमवर आधारित तयार करून घेतली आहे. गणपती बाप्पांची ही मूर्ती पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. गणपती बाप्पाच्या या हटके थीमचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. टीम इंडियानं २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत विजेतेपद पटकावलं. भारतीय संघानं या स्पर्धेत एकही सामना न गमावता, अंतिम फेरीतही तोच ट्रेंड कायम ठेवला आणि दक्षिण आफ्रिकेला हरवून १७ वर्षांची प्रतीक्षा संपवली. टी-२० विश्वचषकामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करीत भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

टी-२० वर्ल्ड कप जिंकल्याचा क्षण अजूनही भारतीयांच्या मनात राहिलेला आहे, जो आपल्याला गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्यातील मूर्तीमधून दिसून आला. ज्यात गणपत्ती बाप्पाची मूर्ती ‘टी-२० वर्ल्ड कप’च्या संपूर्ण थीमवर आधारित आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता, उभा राहिलेला बाप्पा दिसत आहे. यावेळी बाप्पाच्या एका हातात भारताचा तिरंगा आहे तर उंदीर मामाने आपल्या डोक्यावर टी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी उचलेली आहे. बाप्पाच्या आगमनाला जमलेल्या गर्दीचं या बाप्पाने लक्ष वेधून घेतलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जय जवान पथकाचा १० थरांचा थरारक प्रयत्न; एक चूक अन् मनोरा कोसळला, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?

हा व्हिडीओ @MumbaichaGanpathi नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कौतुक कराल.