Shocking video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात.
कुर्ला येथे बेस्ट बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले असता भीषण अपघात घडला होता. ज्यामध्ये अनेकांना प्राण गमावावे लागले. तसेच मागील काही दिवसांत दारु पिऊन बस चालवल्याच्या देखील अनेक घटना समोर आल्या आहेत. ही घटना ताजी असताना सध्या असाच व्हिडिओ व्हायरल होत असून यामध्ये बस चालक मद्यधूंद अवस्थेत बस चालवत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, बदलापूरमधील असल्याचे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बस चालक दारुच्या नशेत गाडी चालवत आहे. याच बसमधील एक प्रवाशाने त्याचा व्हिडिओ बनवला आहे. प्रवासी बस चालकताल दारु पिऊन बस चावलवत असल्याने ओरड आहे. ही संपूर्ण घटना दुसऱ्या एका प्रवाशाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे. त्यात बसमधील एक प्रवासी त्या बस चालकास दारु पिऊन बस चालवत असल्याने ओरडत असतो. सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक
बस चालकाचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @metro_news24x7 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये “मद्यधुंद अवस्थेत एसटी चालकाने चालवली बस” असे लिहिले आहे. हा व्हिडिओ चार महिन्यांपूर्वी पोस्ट केला असून सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले आहे, “अरे अजून किती जीव घेणार?” तर आणखी एकानं, “अशा डायव्हर लोकांवर कारवाई करा. दारू पिऊन एसटी चालवणं आपलाही जीव धोक्यात आणि प्रवासांचाही जीव धोक्यात चुकीची गोष्ट आहे” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.