हल्ली लग्नात नवरा नवरीच्या डान्सचा जणू ट्रेंडचा सुरूये. लग्नसोहळा आयुष्यभरात लक्षात रहावा यासाठी प्रत्येकजण काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतो. सध्या सोशल मीडियावर एका हटके लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये नवरीच्या बहिणी आणि मैत्रिणींनी सरप्राईज डान्स केलाय. हा डान्स व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा पाहातच रहाल. या व्हिडीओमध्ये करवल्या अगदी मनखुलासपणे डान्स करताना दिसून येत आहेत. आपल्या बहिणीच्या लग्नाचा आनंद या करवल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येतेय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्रत्येकजण आपआपल्या कामात व्यस्त असताना अचानक नवरीची बहिणी मंडपाच्या मध्यभागी ठेवलेल्या स्टुलवर उभी राहते आणि अचानक एक गाणं वाजू लागतं. रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा यांचा २०१० च्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातील सुनिधी चौहान आणि मास्टर सलीम यांच्या ‘ऐनवयी ऐनवायी’ गाण्यावर नवरीच्या गर्ल गॅंगने डान्स केलाय. डान्स करताना नवरीच्या बहिणीने चमकदार लेहेंगा परिधान केलाय. डान्स करतानाचे तिचे हावभाव तिला झालेला आनंद पाहण्यासारखा आहे.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
bride groom dance on Bollywood song Akelaa hai mister khilaadi miss khilaadi chaahiye
Video : अकेला है मिस्टर खिलाडी मिस खिलाडी चाहिए! नवरी नवरदेवाने केला बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
ladies group dance on Tuzya Pritit Zale Khuli marathi song video goes viral
VIDEO: “तुझ्या प्रितीत झाले खुळी..” महिलांच्या तुफान डान्सनं सगळ्यांना लावलं वेड; खास अंदाज पाहून कराल कौतुक
Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media
“लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
Groom’s ex-girlfriend crashes wedding, beats him while bride watches in shocking Video
VIDOE: “खतम, टाटा बाय बाय” लग्नात अचानक पोहोचली नवरदेवाची एक्स गर्लफ्रेंड; भर मंडपात नवरी अन् गर्लफ्रेंडमध्ये तुफान राडा

आणखी वाचा : ‘त्या’ टांझानियन तरूणाचा आता ‘Srivalli’ गाण्यावर डान्स VIDEO VIRAL, चाहते म्हणाले, ‘अल्लू अर्जुनही खुश…’

हा व्हिडीओ लग्नातील मेहेंदीच्या कार्यक्रमातला आहे. यावेळी नवरीच्या बहिणीनंतर आजुबाजूने सर्व मैत्रिणी सुद्धा थिरकू लागतात. प्रत्येकजण आपआपल्या हातावरच्या मेहंदीमध्ये व्यस्त असताना अचानक नवरीबाईच्या करवल्यांच्या या सरप्राईज डान्सने आजुबाजुचा माहौलच बदलून गेला. डान्स करताना करवल्यांनी परिधान केलेले पेस्टल कलरचे इंडियन ड्रेसेससुद्धा फारच सुंदर दिसतात. करवल्यांचा हा सरप्राईज डान्स पाहून इतर पाहुणे सुद्धा त्यांना चिअर अप करताना दिसून येत आहेत.

आणखी वाचा : Viral Video : अशी शिकवण्याची पद्धत तुम्ही कधीच पाहिली नसेल, बघून पोट धरून हसाल!

हा व्हिडीओ ‘theweddingministry’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. ‘जेव्हा बहिणीचं लग्न होतं त्यावेळी तुमचा उत्साह भरपूर वाढतो’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये बहिणीचं लग्न होत असल्याचा आनंद करवल्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. आनंदाच्या भरात करवल्यांच्या एनर्जेटीक डान्स स्टेप्स पाहून प्रत्येकजण कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : असं कुणी करतं का? कपल डान्स करताना चुकली म्हणून तिला सगळ्यांसमोर मारू लागला…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाबो! एक नव्हे दोन सिंहांसमोर छातीठोकपणे उभा राहिला हा माणूस, लोक ओरडत राहिले पण…

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागला आहे की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. हा मजेदार व्हिडीओ लोक इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा शेअर करत आहेत. हा डान्स पाहून नेटकरी आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader