वडापाव हा अनेकांचा आवडता पदार्थ आहे. महाराष्ट्रात प्रत्येक चौकात किंवा गल्लीत वडापाव विक्रेते पाहायला मिळतात. आपल्यापैकी अनेकजण आवडीने वडापाव खातत पण तुम्ही कधी विचार केला आहे का हे वडापाव विक्रेते महिन्याला किती पैसे कमवातात? असाच प्रश्न एका व्लॉगरलाही भेटला. सार्थक सचदेवा नावाच्या व्लॉगरने वडा पाव विक्रेत्याच्या मासिक कमाई जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पारंपारिक नोकऱ्या आणि रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेता यांच्यातील उत्पन्नाच्या असमानतेवर प्रकाश टाकणारा सार्थक सचदेवाचा याचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे.

सार्थक सचदेवा एका वडापाव विक्रेत्याच्या स्टॉलवर दिवसभर काम करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वडापावस कसा तयार करायचा हे शिकला, दिवसभर वडपाव स्टॉलवर काम केले आणि वडपावाची विक्री केली. व्हायरल व्हिडीओमध्ये त्याने किती वडापाव विकले आणि दिवसभरात त्याने किती पैसे कमावले हे दाखवले आहे.

व्हिडीओमध्ये सार्थक सांगतो की, “ आज मी एका दिवसात वडा पाव विकून किती पैसे कमवू शकतो ते पाहणार आहे. मी सकाळची सुरुवात निरीक्षण करून शिकून केली, नंतर गरमागरम वडा पाव बनवला.” स्टॉलवर ग्राहकांची गर्दी होत असताना, वडापावला विशेषत: सकाळच्या वेळी जास्त मागणी असल्याचे दिसून आले.”

हेही वाचा –भारतात Instagram बंद पडल्याने वापरकर्ते हैराण! #instagramdown हॅशटॅग होतोय ट्रेंड

“एक वडा पावाची किंमत १५ रुपये आहे. अवघ्या अडीच तासामध्ये त्याने सुमारे २०० वडापाव विकले. दुपारच्या वेळी फारसे ग्राहक नव्हते पण संध्याकाळी ग्राहकांची गर्दी झाली होती. व्लॉगरचे दिवसभरात तब्बल ६२२ वडा पाव विकले. एका दिवसात, ते अंदाजे ९,३०० रुपये महिन्यासाठी, ते२,८०,००० रुपये आहे. खर्च वजा केल्यावर, दरमहा सुमारे २,००,००० रुपये आणि वर्षासाठी २४ लाख रुपये होतील.” अशी माहिती सार्थकने दिली.

सार्थक सचदेवाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, सोशल मीडियावर आश्चर्यकारक प्रतिक्रिया उमटत आहेत. कमेंटमध्ये दर्शकांनी त्यांचे आश्चर्य आणि कौतुक व्यक्त केले.

हेही वाचा –अंबानी कुटुंबात कसा खेळतात गरबा अन् दांडीया? पाहा Viral Video

एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “योग्य ठिकाणी दुकान लावण्याची शक्ती,”
दुसरा म्हणाला की, “भाऊ मला अभ्यास सोडण्यास प्रवृत्त करत आहे.”

काही वापरकर्त्यांनी स्वतःचा फूड कार्ट व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला, एका व्यक्तीने मित्राला टॅग केले आणि म्हटले, “चला फूड कार्ट व्यवसाय सुरू करूया.”

सचदेवाचा व्हिडिओ रस्त्यावरील उद्योजकतेच्या माध्यमातून मिळू शकणाऱ्या संभाव्य कमाईचे स्मरणपत्र म्हणून काम करतो, पारंपारिक व्हाईट कॉलर नोकऱ्या हे आर्थिक यशाचे एकमेव व्यवहार्य साधन आहे या कल्पनेला आव्हान देत आहे. व्हिडिओमध्ये सादर केलेले प्रभावी आकडे अनौपचारिक अर्थव्यवस्थेत उपलब्ध असलेल्या संधी आणि रस्त्यावरील विक्रेत्यांच्या उद्यमशीलतेबद्दल चर्चा करत आहेत.

अधिक लोक फूड स्टॉल आणि स्ट्रीट फूड व्यवसायांकडे वळत असतान हा व्हायरल व्हिडिओ शहरी भारतातील रस्त्यावर विक्रीच्या आकर्षक क्षमतेचा पुरावा आहे.