थॉमस पेस्क्वेट, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशन (ISS) वर असलेले अंतराळवीर अनेकदा अविश्वसनीय फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. त्यांनी टिपलेल्या फोटोजमधून अंतराळातील अनेक गोष्टी बघयला मिळतात. अवकाशात गडगडाटासह वादळ दाखवणाराने फोटो थॉमस पेस्क्वेट यांनी अलीकडील शेअर केले आहेत. हे फोटो इतके सुंदर आहेत की ते पुन्हा पुन्हा बघण्याचा मोह आवरू शकत नाही.
“अंतराळात गडगडाटासह येणारी वादळं ही फटाक्यांसारखी असतात. रात्रीच्या अंधारात ही उज्ज्वल लखलखाट पाहून आम्हाला खूप आनंद होतो. ”त्याने सुंदर फोटो शेअर करत कॅप्शन लिहले.
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
सुमारे १ दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्ट केल्यापासून, पोस्टला आतापर्यंत सुमारे १०९,८६९ लोकांनी पसंती दर्शवली आहे आणि अनेक लोक अजूनही फोटोला पसंती दर्शवत आहेत. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत. “भव्य” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “विलक्षण” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहले. “व्वा” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहले. या सुंदर फोटोवर तुमचे काय मत आहे? तुम्हाला मंत्रमुग्ध केले आहे का?