काही महिला या त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच अष्टपैलू बनविण्यावर विश्वास ठेवतात. यासाठी महिला त्यांच्या मुलांना डान्सिंगपासून ते स्विमिंगचे क्लासेस लावतात. पण कधी कधी मुलांना शिकवताना आपलीज फजिती होते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिला एका छोट्याश्या मुलाला स्विमिंग शिकवताना दिसून येतेय. पण त्या नादात ही महिला स्वतःचंच हसू करून घेते. हा व्हिडीओ पहायला फारच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला हसू आवरणार नाही हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला छोट्याश्या मुलाला स्विमिंग कशी करायची हे शिकवते. या महिलेला पाहून तिलाच स्वतःला तोल सांभाळणं शिकणं गरजेचं असल्याचं दिसून येत आहे. या महिलेचं वजन खूप जास्त असल्यामुळे तिचा तोड बिघडताना दिसतोय. ही महिला लहान मुलाला पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये उडी मारण्यास सांगताना दिसतेय. जेव्हा मुलगा उडी घ्यायला घाबरतो तेव्हा ती तिचा एक पाय तलावात टाकते आणि मुलाला दाखवते की आपला पाय अशा प्रकारे तलावात टाकायचा असतो. यावेळी सुरूवातीला तिचा तोल बिघडतो. पण यात ती स्वतःला सावरते. मग ती पूलवर बनवलेल्या पायऱ्यांकडे जाते. यावेळी मात्र मोठी गंमत होते. पायऱ्यांवर जाता तिचा पाय अडकतो आणि ती धापकन स्विमिंग पूलमध्ये पडते.

आणखी वाचा : वा रं पठ्ठ्या! अवघ्या एका सेकंदात सोडवलं रुबिक्स क्यूब, कसं ते पाहा हा VIRAL VIDEO

हे दृश्य फारच मजेदार आहे. स्विमिंग पूल फार खोल नाही. त्यामुळे या महिलेला कोणतीही दुखापत झाली नाही. स्विमिंग पूलमध्ये पडल्यानंतर हा महिला लगेच हसायला लागते आणि तिला पाण्यात पडताना पाहून मुलगही पुन्हा पाण्यात येण्याचे धाडस करतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : पतीने बाईकवर लिहिला असा संदेश जो वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : कांगारूची एका व्यक्तीसोबत जबरदस्त फाईट, रागाच्या भरात त्याला इतका आपटला की.. पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ ‘व्हायरल होग’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर दोन हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट्स करताना दिसून येत आहेत.