फूड डिलिव्हरी अ‍ॅप म्हटलं की सर्वात पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे झोमॅटो. नेटकऱ्यांमध्ये चर्चेत राहण्यासाठी झोमॅटो बरेचदा आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक मनोरंजक पोस्ट शेअर करत असते. त्यांच्या बऱ्याच पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल देखील होत असतात आणि नेटकरी त्यावर भन्नाट प्रतिक्रियाही देत असतात.

अनेकवेळा झोमॅटो आपल्या ट्विटच्या माध्यमातून लोकांना त्यांच्याबद्दल आपले मत मांडण्याची संधीही देतो. अलीकडे झोमॅटोने आपल्या ट्विटर हँडलवरून एक प्रश्न ट्विट केला आहे. आणि या प्रश्नांवर नेटकऱ्यांनी नेहमीप्रमाणेच एकदम हटके आणि भन्नाट उत्तरे दिली आहेत. या फूड डिलिव्हरी अ‍ॅपने आपल्या फॉलोअर्सला ट्विट करून विचारले आहे की ‘जर २०२२ चा पूर्वार्ध एखादी डिश असेल, तर ती कोणती डिश असेल?’ यावर काही लोकांनी उग्रपणे उत्तरे द्यायला सुरुवात केली, तर काही युजर्सनी अशी उत्तरे दिली आहेत की तुम्हाला हसू येईल.

झोमॅटोने ट्विटरवर हा प्रश्न उपस्थित करताच लोकांनीही तीव्र प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही वापरकर्त्यांनी त्यांचा राग फूड डिलिव्हरी अ‍ॅपवर काढला आहे.

तर अशी काही उत्तरे आहेत जी वाचल्यानंतर तुम्हाला हसू येईल. एका यूजरने लिहिले आहे की, ‘एक प्रचंड तेलकट बिर्याणी. जेवण डिलिव्हर होण्यापूर्वी खूप अपेक्षा होत्या, ते आल्यावर मात्र मी निराश झालो, पण तरीही मी ते खाल्ले.’ त्याच वेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘पूर्ण किंमतीत अर्धी ऑर्डर मिळाली.’

Viral Video : कुस्तीपटूने ‘द ग्रेट खली’ सोबत घेतला पंगा; त्यानंतर जे घडले, ते तो कधीही विसरणार नाही

झोमॅटोच्या या प्रश्नावर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काही प्रतिक्रिया अतिशय मजेशीर होत्या, तर काही प्रतिक्रिया वाचून असे म्हणता येईल की, हा प्रश्न विचारून झोमॅटोने ‘स्वतःच्या पायावर दगड मारणे’ ही म्हण सिद्ध केली आहे.

Story img Loader