Virar station viral video: प्रेमासमोर जगाची पर्वा केली जात नाही असे म्हटले जाते. मात्र आजची पिढी या गोष्टीचे जास्तीच अनुकरण करत असल्याचे दिसून येत आहे. प्रेमात पडल्यावर वेळ-काळ नाही बघावा असेही म्हटले जाते मात्र ते व्यक्त करताना आजूबाजूच्या परिस्थीची जाण ठेवणे फार गरजेचे असते. आजकाल प्रेमाच्या व्याख्या फार बदलल्या आहेत. पूर्वीप्रमाणे तरुण आजकाल आपले प्रेम व्यक्त करताना घाबरत नाहीत, रोखठोकपणे ते आपली मतं मांडतात मात्र बऱ्याचदा नको त्या ठिकाणी आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करू लागतात, यामुळे इतर लोकांना याचा त्रास होत असतो.

आपण प्रेमात आपल्या मर्यादा लक्षात घेऊन गोष्टी करायला हव्यात, भान हरपून कुठेही आपले प्रेम व्यक्त करू नये. आजकाल तरुण-तरुणी सार्वजनिक ठिकाणी आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत. सोशल मीडियावर येत्या काळात असे अनेक व्हिडिओज व्हायरल झालेत. सध्या यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. सोशल मीडियावर नुकताच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक कपल विरार रेल्वे स्थानकाच्या ब्रीजवर अश्लील चाळे करताना दिसून येत आहे. त्याच्या या लज्जास्पद कृतीचा व्हिडिओ जवळील एका व्यक्तीने आपल्या कॅमेरात कैद केला असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी प्रेमी युगुल खुलेआम रोमान्स करताना दिसतात. मुंबईतील नरिमन पॉइंट असो किंवा वांद्रे बॅंडस्टँड यासारख्या अनेक ठिकाणी लहान मुलांना घेऊन फिरणं कठीण झाले आहेत. अशातच या व्हिडीओमधील प्रेमी युगुलाने हद्द पार केली आहे. रेल्वे स्टेशनवरील ब्रीज एक कपल नॉनस्टॉप किसींग करत आहेत. हा व्हिडिओ विरार रेल्वे स्थानकावरचा आहे. विरार रेल्वे स्थानक हे प्रवाशांनी नेहमीच गजबजलेलं असतं. अशा गजबजलेल्या भर गर्दीतच या तरुण-तरुणीचे अश्लिल चाळे सुरु होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तरुण आणि तरुणी एकमेकांना मिठी मारत आहेत आणि किस करत आहेत, असं व्हिडीओमध्ये दिसतं. तसेच दोघेही ब्रीजच्या अगदी कडेला उभे असल्यानं तोल जाऊन पडण्याचीही भीती आहे, मात्र कशाचीच पर्वा न करता हे कपल बेभान झाल्याचं दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

लोकांमध्ये नाराजी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ virarmerijaan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत.लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.


Story img Loader