भारतामध्ये क्रिकेट, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्राबद्दल सर्वाधिक चर्चा होते असं बोललं जातं. त्यातही या दोन क्षेत्रातील व्यक्ती एकत्र आल्यानंतर त्या कायमच चर्चेत असतात. असचं एक कायम चर्चेत राहणारं जोडपं म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा. सध्या हे दोघे चर्चेत आहेत ते एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे. या व्हिडिओमध्ये हे दोघे एका सोहळ्यामध्ये सर्वांसमोर किसींग करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच या दोघांनी मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स इव्हेंट’सोहळ्याला हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील काही फोटो आणि व्हिडिओ दोघांनाही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केले होते. विराट आणि अनुष्का दोघंही स्टायलिश अंदाजामध्ये पाहायला मिळाले. विराटने पांढरा शर्ट आणि काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता तर अनुष्काने ब्लॅक हाइ-वेस्टेड पॅण्टसोबत क्रॉप टॉप घातला होता.

मात्र आता याच कार्यक्रमामधील एक व्हिडिओ आता विराटच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. यामध्ये विराट आणि अनुष्का एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

दरम्यान या आधी काही आठवड्यांपूर्वी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानातील नवीन पॅव्हेलियन स्टँडला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं नाव देण्यात आलं त्यावेळीही विराटचा मोठ्या व्यासपीठावर होत असलेला सत्कार पाहून अनुष्का आपले आनंदाश्रू थांबवू शकली नाही. ज्या मैदानावर विराटने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली, त्याच मैदानावर आज विराटचा भव्य सत्कार ही सर्वांसाठी मोठी गोष्ट असल्याचं अनुष्काने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.