Virat Kohli Interesting Facts : क्रिकेटचे मैदान गाजवणारा महान फलंदाज विराट कोहली अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेकदा तो आपल्या कृतीतून तर कधी बोलण्यातून प्रेक्षकांची मनं जिंकत असतो, हा महान फलंदाज मंगळवारी ३६ वर्षांचा झाला. विराटने जागतिक क्रिकेटमध्ये अशी काही छाप सोडली आहे की, भारतातीलच नाही तर जगभरातील चाहते त्याच्यासाठी वेडे आहेत. विराटने आतापर्यंतच्या कारकिर्दीत एका फलंदाजाला हवे तसे सर्व काही साध्य केले आहे. पाहिले तर त्याने प्रत्येक आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यानंतर २००८ मधील अंडर-१९ विश्वचषक असो, २०११ मधील एकदिवसीय विश्वचषक असो, २०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा यावर्षी आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकणे असो. अशा अनेक क्रिकेट सामन्यांत त्याने आपले वेगळेपण दाखवले, आज विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याविषयी कधीही न ऐकलेल्या गोष्टी जाणून घेऊया

क्रिकेटचीच का केली निवड?

विराट कोहलीचे एकेकाळी क्रिकेट आणि टेनिस या दोन्ही खेळांवर विशेष प्रेम होते. पण शेवटी त्याने क्रिकेटची निवड केली कारण त्याच्या वडिलांसह अनेकांनी त्याला या खेळासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्याने क्रिकेटमध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला.

A woman recreated a Bollywood song for her husband
VIRAL VIDEO: नशा दौलत का ऐसा भी क्या? लग्नाच्या वाढदिवसादिवशी ऑफिसचं काम करताना पाहून बायकोने रिक्रिएट केलं ‘हे’ गाणं
Special Puneri pati for single people After reading you will also say "it's true brother" photo goes viral
PHOTO: “पगाराचा अकडा आणि जमिनीचा तुकडा…” सिंगल मुलांसाठी…
Alert please check when you will eat vegetable of palak shocking video goes viral
महिलांनो सावधान! तुम्हीही पालकची भाजी खाताय का? थांबा…’हा’ VIDEO पाहाल तर झोप उडेल
Women Viral Video
‘एक्सप्रेशन्स असावे तर असे…’ ट्रेनमध्ये भेळ विकणाऱ्या महिलेची ॲक्टिंग पाहा; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Emotional Moment! Video viral
Video : “बापानंतर नि:स्वार्थ प्रेम करतो तो म्हणजे भाऊ!” भावाला हळद लावताना पाहून नवरी ढसा ढसा रडली, पाहा व्हायरल व्हिडीओ
woman misbehaving in a train with a man Viral video on a social media
‘तो’ दोन तास शेजारी उभा होता; पण महिलेने रिकाम्या सीटवरून काढला नाही पाय, ट्रेनमधील ‘हा’ VIDEO पाहून सांगा चूक कोणाची?
trying to do a stunt on a bicycle
‘कशाला जीवाची बाजी लावता…’, सायकलवरून स्टंट करायच्या नादात गेला तोल… पुढे जे घडलं; VIDEO एकदा पाहाच…
Cheetah Viral Video
Video : बापरे! तो वाऱ्याच्या वेगाने आला अन्… शिकार मिळविण्यासाठी चित्त्याची धाव पाहून नेटकरीही झाले अवाक्
Virat Kohli Birthday Special
विराट कोहलीबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट

वडिलांनी बदलला क्रिकेटकडे बघण्याचा दृष्टिकोन (Virat Kohli Interesting Facts Google Trend)

विराटचे वडील प्रेम कोहली हे पेशाने वकील होते ज्यांचे डिसेंबर २००६ मध्ये निधन झाले. पण, वडिलांच्या निधनानंतर विराटचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आपल्या वडिलांबद्दल बोलताना, कोहलीने ऑडिबलवरील ऑडिओबुकमध्ये म्हटले होते की, ‘त्या दिवशी खेळाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. माझ्या मनात एकच गोष्ट होती की, मला माझ्या देशासाठी खेळायचे आहे आणि माझ्या वडिलांच्या स्वप्नांसाठी जगायचे आहे. रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली कर्नाटकशी खेळत असताना विराटच्या वडिलांचे निधन झाले, पण यानंतर दुसऱ्याच दिवशी विराटने सामन्यात भाग घेतला आणि आपल्या संघाला विजयापर्यंत नेले.

हेही वाचा- भरगच्च ट्रेनमध्ये बसण्यासाठी सीट न मिळाल्याने तरुणाचा ढासू जुगाड, दोरीचा केला असा वापर; VIDEO एकदा पाहाच

विराटचे प्रेरणास्थान कोण?

लहानपणापासूनचं क्रिकेटचा आयकॉन सचिन तेंडुलकर विराट कोहलीसाठी प्रेरणास्त्रोत होता. २०११ च्या विश्वचषक विजेतेपदानंतर कोहलीने सचिन तेंडुलकरला अभिमानाने आपल्या खांद्यावर घेतले. हा तो क्षण होता जेव्हा सचिन आपला शेवटचा विश्वचषक खेळत होता आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्याची धुरा इतर खेळाडूंच्या हाती सोपवत होता. तेव्हा विराट सचिनबद्दल म्हणाला होता की, “त्यांनी २४ वर्षे या देशाचा भार उचलला आहे, त्यामुळे आता वेळ आली आहे की, आपण हा भार आता आपल्या खांद्यावर घेण्याची.”

Virat Kohli Birthday google trend
विराट कोहली गुगल ट्रेंड

विराटला फुटबॉलचीही होती आवड

विराटला फुटबॉल खेळायलादेखील तितकेच आवडत होते, म्हणूनच सप्टेंबर २०२४ मध्ये सुरू झालेल्या इंडियन सुपर लीग फुटबॉल टूर्नामेंटमधील एफसी गोवा या संघात त्याची हिस्सेदारी आहे. ही लीग भारतात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली. तेव्हा कोहलीने या लीगमध्ये उत्सुकता दाखवली होती. ‘भारतात फुटबॉलचा विकास व्हावा, अशी माझी इच्छा आहे,’ अस तो यावेळी म्हणाला होता.

विराट होता फास्ट फूडचा शौकीन

विराट कोहली आता पूर्ण शाकाहारी आहे, पण एकेकाळी त्याला फास्ट फूडचा खूप शौक होता. बर्गरपासून ते बटर चिकनपर्यंत सर्व काही कोहलीने एन्जॉय केले. कालांतराने, विराटला फिटनेसचे महत्त्व समजले, त्यानंतर तो त्याच्या खाण्याच्या सवयींमध्ये खूप सावधगिरी बाळगू लागला. आज विराट जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूंपैकी एक आहे.