क्रिकेट आणि बॉलिवूडमधील दिग्गजांनी रविवारी एका चॅरिटी फुटबॉलमध्ये नेहमीप्रमाणेच रंगत आणली. हा सेलिब्रिटी सामना शहाजीराजे भोसले स्टेडिअमवर खेळवण्यात आला होता. एकीकडे होती विराट कोहलीची टीम तर दुसरीकडे रणबीर कपूरची. या सामान्यात कोहलीच्या संघाने रणबीर कपूरच्या संघाला ७-३ च्या फरकानं हरवलं. हा सामना जिंकण्याचा कोहलीला इतका आनंद झाला की गोल केल्यानंतर कोहली चक्क मैदानातच भांगडा करू लागला. आनंद साजरा करताना कोहलीचा भांगडा डान्स कॅमेऱ्यात कैद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : जाणून घ्या #MeToo हॅशटॅग का होतोय ट्रेंड

कोहलीच्या ‘ऑल हार्ट एफसी’ संघात क्रिकेटर्स होते, अगदी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीदेखील होता. तर रणबीरच्या ‘ऑल स्टार्स एफसी’मध्ये फुटबॉलप्रेमी अभिनेते होते. दोन्ही संघामधला सामना रंगला खरा पण यात बाजी मारली ती कोहलीच्या संघाने. फुटबॉलचा तगडा अनुभव असलेल्या धोनीने दोन गोल करुन आपल्या संघाची बाजू अधिक बळकट केली. त्यामुळे रणबीरच्या ‘ऑल स्टार्स एफसी’ला ७-३ च्या फरकानं हरवल्यानंतर कोहलीच्या आनंदाला पारावर उरला नाही. गोल करताच कोहलीला मैदानातच भांगडा करण्याचा मोह अनावर झाला, त्याचा भांगडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : भारतीय वंशाच्या मुलांची प्रेरणादायक कामगिरी, दीड वर्षांत झाला कोट्यधीश

फुटबॉल सामन्यानंतर २२ ऑक्टोबरपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.