क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी केली आणि सलग १० सामने जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. त्यामुळे भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाच्या वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या. पण, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा ६ विकेट्स राखून पराभव केला आणि यासह करोडो भारतीय चाहत्यांचे आणि टीम इंडियाचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आणि ऑस्ट्रेलियन संघ सहाव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यानंतर भारतीय फलंदाज विराट कोहलीला विश्वचषक २०२३ मधील ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु, त्याच्यासाठी सर्वात मोठा आनंद हा विश्वचषक ट्रॉफी उचलण्याचा होता, मात्र ते स्वप्न काही पूर्ण झाले नाही. यानंतर कोहली कितीही दु:खी झाला असला तरी त्याने आपल्या सहकाऱ्यांना आनंदी ठेवण्याचा नेहमीप्रमाणेच प्रयत्न केला, अंतिम सामन्यातही तेच दिसून आले. त्याने विश्वचषक २०२३ च्या विजेत्या संघातील खेळाडू आणि आरसीबी संघातील त्याचा सहकारी ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारली आणि विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर त्याने मॅक्सवेलला एक खास वस्तू भेट म्हणून दिली, ही भेटवस्तू म्हणजे त्याची जर्सी.
World Cup 2023 : विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने ग्लेन मॅक्सवेलचे अभिनंदन करत दिली ‘ही’ खास भेट
विराट कोहलीने विश्वचषक २०२३ च्या विजेत्या संघातील खेळाडू आणि आरसीबी संघातील त्याचा सहकारी ग्लेन मॅक्सवेलला मिठी मारली आणि विजयाबद्दल अभिनंदन केले. यानंतर त्याने मॅक्सवेलला एक खास वस्तू भेट म्हणून दिली.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-11-2023 at 13:53 IST
TOPICSआयसीसी विश्वचषक २०२३ICC World Cupक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupग्लेन मॅक्सवेलGlenn Maxwellट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoविराट कोहलीVirat Kohliविश्वचषक २०२३World Cup
+ 4 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli congratulated glenn maxwell after he wins world cup 2023 and give his jersey as a gift sjr