World Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात (Ind vs SA)भारतीय संघाची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. भारताने दक्षिण आफ्रिकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला. इतकेच नाही तर किंग कोहलीने त्याच्या कारकिर्दीतील ४९ वे शतक झळकवले. मात्र, विराटच्या शतकापेक्षा त्याचा डान्स चाहत्यांना अधिक आवडला आहे. या सामन्यात किंग कोहलीने पत्नीच्या गाण्यावर जबरदस्त डान्स केला. कोहलीच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यातील त्याच्या डान्स स्टेप्सने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
विराट कोहली क्रिकेट मैदानात खेळतच नाही, तर चाहत्यांचेही भरपूर मनोरंजन करीत असतो. क्रिकेटच्या मैदानात फिल्डिंग करताना कोहली चाहत्यांना कंटाळू देत नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यातही विराटचा असाच ‘चिलिंग अंदाज’ पाहायला मिळाला. या सामन्यादरम्यान डीजेवर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या चित्रपटातील गाणे वाजले. ‘बँड बाजा बारात’मधील ‘ऐंवी ऐंवी लुट गया’ हे गाणे वाजताच विराट स्वत:ला नाचण्यापासून आवरू शकला नाही. विराटने यावेळी ‘ऐंवी ऐंवी लुट गया’ गाण्यातील अनुष्काच्या डान्स स्टेप्स करून दाखवल्या. इतकेच नाही तर विराट हात पसरून शाहरुख खानची सिग्नेचर स्टेप करतानाही दिसला. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे.
विराट कोहलीसाठी अतिशय संस्मरणीय दिवस
विराट कोहलीने ५ नोव्हेंबर रोजी त्याचा ३५ वा वाढदिवस साजरा केला. याच दिवशी त्याने शतक झळकवून हा दिवस आणखी खास केला. त्यामुळे कोहलीच्या आयुष्यात ५ नोव्हेंबर हा दिवस अतिशय संस्मरणीय ठरला आहे.