Virat Kohli Instagram Viral Video: टी २० विश्वचषकातून भारताचे आव्हान संपुष्टात येताच विराट कोहली काहीच दिवसात मायदेशी परतला होता. टी २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंडकडून भारताचा १० गडी राखून पराभव झाला, हा लाजिरवाणा पराभव केवळ रोहित शर्मा किंवा विराटच नव्हे तर कोट्यवधी भारतीयांच्या जिव्हारी लागणारा ठरला होता. कोहलीने सुद्धा विश्वचषकातून बाहेर पडताच निराश मनाने ट्विटरवर पोस्ट केली होती. मात्र एखादी अप्रिय घटना घडल्यावर सोशल मीडियावर आधी पोस्ट करून दुःख व्यक्त करण्याची ही पद्धत आपल्याला आवडत नसल्याचे आज कोहलीने आपल्या एका इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केले आहे. पंकज त्रिपाठी यांचा एका कार्यक्रमातील हा जुना व्हिडीओ स्टोरीला शेअर करून कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विराट कोहलीने शेअर केलेल्या स्टोरीत असे म्हंटले आहे की, आपण सर्वच सोशल मीडियाचे बिनपगारी कार्यकर्ते आहोत. या व्हिडिओत पंकज त्रिपाठी म्हणतात की, “काहीही घडलं तरी काही सेकंदात आधी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यावर प्रतिक्रिया देणं हे आज गरजेचं झालं आहे. मात्र आपल्या भावना लगेच व्यक्त केल्याच पाहिजेत हा नियम काही मला पटत नाही, सोशल मीडियाने पगार देऊन १००० कर्मचारी कामावर ठेवले असतील पण बिनपगारी असे अनेक कर्मचारी काम करत आहेत, हे फुकट काम मला आवडत नाही, म्हणूनच मी सोशल मीडियावर कोणतीच भावना व्यक्त करणे टाळतो”
विराट कोहली इंस्टाग्राम स्टोरी
विराट कोहलीने शेअर केला पंकज त्रिपाठी यांचा व्हिडीओ
Shoaib Akhtar vs Shami: मोहम्मद शमीच्या ‘Karma’ ट्वीटवर शोएब अख्तर भडकले, म्हणाले “याला Sense.. “
दरम्यान,काल टी २० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या विजयानंतरही विराटने खास स्टोरी पोस्ट करून जोस बटलरच्या इंग्लंड संघाचे कौतुक व अभिनंदन केले होते. विश्वचषकानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर असणार आहे, या टीम मध्ये हार्दिक पांडया संघाच्या टी २० टीमचे नेतृत्व करणार आहे मात्र रोहित शर्मा व विराट कोहलीला सध्या विश्रांती देण्यात आली आहे.