रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा (RCB) फलंदाज विराट कोहलीने आयपीएल २०२३ च्या प्लेऑफमध्ये आपला संघ नेण्यासाठी सर्व प्रयत्न केले. विराटने काल चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात सलग दुसरे आयपीएल शतक झळकावले. कोहलीने धडाकेबाज फलंदाजी करत ६१ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या. मात्र, गुजरात टायटन्सच्या शंकर आणि शुबमन गिलच्या जबरदस्त खेळीने या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला. काल झालेल्या सामन्यात शुबमन गिलने, त्याने ५२ चेंडूत ८ षटकार आणि ५ चौकारांच्या जोरावर १०४ धावांची नाबाद शतकी खेळी केली. गुजरातने आरसीबीचा पराभव केल्यामुळे आरसीबी प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आणि मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये पोहचली.
विराटने खूप प्रयत्न करुनही आरसीबीचा झालेला पराभव त्याच्या चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. अनेकांनी विराटच्या फलंदाचीचं आणि त्याच्या प्रयत्नाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. तर अनेकांनी विराटचे आभार मानणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या आहेत. विराटनं या सामन्यात ६१ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या करत संघाला १९७ धावांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे गुजरात हा सामना सहजासहजी जिंकेलं असं कोणालाचं वाटलं नव्हतं.
मात्र, या सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आणि या संघाने हातातोंडाशी आलेला घास गमावला. या पराभवाचं दुःख विराटला देखील काही केल्या लवपता आलं नाही. कारण एवढे प्रयत्न करूनही संघाला प्ले ऑफमध्ये नेता न आल्याचं दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये विरोटचे डोळे पाणावल्याचं दिसत आहे. हा व्हायरल फोटो पाहून आरसीबीच्या चाहत्यांना देखील खूप वाईट वाटलं आहे. हा फोटो बघताच अनेकांनी तु खूप चांगले प्रयत्न केलेस आम्हाला तुझा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.
पाण्याची बॉटल उडवली –
आरसीबीच्या पराभवानंतर निराश झालेल्या विराट कोहलीने पाण्याची आपटली. मात्र, काही क्षणातच तो उठला आणि मैदानात गेला आणि शुबमन गिलचे अभिनंदन केले. यानंतर तो गुजरात टायटन्सच्या खेळाडूंसोबत हसताना आणि गप्पा मारतानाही दिसला.
अनेकांनी या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. विराट तु आमच्यासाठी नेहमीच नंबर वन राहणार आहेस असं म्हटलं आहे. तर काहींनी तुच नेहमीच किंग राहशील अशाही कमेंट केल्या आहेत.
एका नेटकऱ्यांने लिहिलं आहे, “काळजी करू नको चॅम्प… तु नेहमीच आमचा किंग आहेस, आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे.” तर अनेकांनी विराटच्या डोळ्यातील पाणी हे त्याच्या टीम बद्दल असलेले प्रेम दाखवत असल्याचं म्हटलं आहे.