CSK vs GT Fans Saved By Virat Kohli: चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएलच्या १६ व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२८मे) पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी म्हणजेच २९ मेला राखीव दिवशी अंतिम सामना होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियममध्ये हौशीने आलेल्या प्रेक्षकांना सुद्धा पळता भुई थोडी झाली होती. चेन्नई व गुजरातच्या या सामन्यात धोनी व पांड्याच्या फॅन्सना वाचवण्यासाठी विराट कोहलीच अप्रत्यक्षपणे पुढे आला होता. आता याचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर होत आहे. नेमकं असं किंग कोहलीने केलं तरी काय, चला पाहूया…
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की स्टेडियममध्ये अनेक ठिकाणी यंदाच्या हंगामातील स्टार खेळाडूंचे मोठे मोठे पोस्टर व बॅनर लावण्यात आले होते. पावसाच्या सरी कोसळू लागल्यावर प्रेक्षकांनी यातील विराट कोहलीचे पोस्टर काढून डोक्यावर घेतले आणि अनेक जण त्या पोस्टर खाली उभे राहून स्वतःला पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट करून “बिचारा विराट कोणाकोणाला वाचवणार”, “जाऊदे आरसीबी अशी तरी फायनलच्या मैदानात आली” असे म्हटले आहे.
Video: धोनी व पांड्याच्या फॅन्सला विराटचा आधार
हे ही वाचा<< CSK vs GT मध्ये धोनी व हार्दिक पांड्याची ‘प्लेइंग ११’ कशी असणार? ऋतुराज, शुबमनची जागा पक्की पण…
दुसरीकडे, दोन्ही संघाचे कर्णधार व व्यवस्थापनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आज २९ मे ला नरेंद्र मोदी स्टेडियममध्येच सामना पार पडणार आहे. जर दुर्दैवाने आजच्या सामन्यातही पाऊस पडलाच तर पॉईंट टेबलमध्ये अव्वल असणारा गुजरात टायटन्स संघ विजयी घोषित केला जाईल.