भारतीय कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत सध्या सुट्टी एन्जॉय करत आहे. रोमँटिक कपल एकमेंकासोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहेत. न्यूझीलंडविरोधात पहिल्या तीन सामन्यात विजय मिळवल्यानंतर विराट कोहलीला अखेरच्या काही सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे.
न्यूझीलंड विरोधात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अनेक वैयक्तिक आणि सांघिक विक्रम मोडले. मात्र त्याच्यावरील मानसिक आणि शारीरिक ताण लक्षात घेता न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी आणि टी२० मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या मोठ्या सुटीचे औचित्य साधून विराट आता Vacation Mode वर गेला आहे. त्याने पत्नी अनुष्का सोबत एक फोटो ट्विट केला आहे. अनुष्कासह विराट झकासपैकी सुटीवर आहे. त्याने ट्विट केलेल्या फोटोमध्ये दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून येतोय. एकमेंकाच्या बाहूपाशात रोमँटिक अंदाजामध्ये विरूष्का दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या फोटवर नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहे.
— Virat Kohli (@imVkohli) February 1, 2019
दरम्यान, कोहली भारतासाठी मैदानावर खेळत असताना अनुष्काने बहुतांश सामन्यात स्टेडियममध्ये हजेरी लावली होती आणि टीम इंडियासोबत वेळ घालवला होता.