Virat Kohli Main Nahi To Kaun Be Rap Video: भारताने आयसीसी T20 विश्वचषक २०२२ मधील पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध चार गडी राखून जिंकला. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे झालेल्या ग्रुप २, सुपर १२ सामन्यात विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीमुळे भारताने मालिकेची विजयी सुरुवात केली. विराट कोहलीने सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देताच त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पण त्यातही डोंबिवलीकर ‘बि युनिक’ (Beyounick) ने विराटचा शेअर केलेला व्हिडीओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडिओमध्ये Hustle 2.0 या कार्यक्रमातील सृष्टी तावडे हिचा ‘मैं नही तो कौन रॅप’ गुणगुणताना विराट कोहली दिसत आहे.

खरंतर हा व्हिडीओ लीप सिंक करून बनवलेला आहे पण तो इतका परफेक्ट जुळून आलाय की खरोखरच विराट स्वतः ‘मैं नही तो कौन’ असं म्हणताना दिसतोय. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात खरंच विराटने एका हाती भारताचा संपूर्ण खेळ उचलून धरला होता, त्यामुळे किंग कोहलीचा हा व्हिडीओ शेअर करून चाहतेही खरंच तू नाही तर कोणी नाही अशे कॅप्शन देत आहेत. Beyounick ने हा व्हिडीओ पोस्ट करताना विराटचे आभार मानले आहेत.

Jaya Kishori Viral Photo fact check
जया किशोरींनी सुरू केले मॉडेलिंग! व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; वाचा, नेमकं सत्य काय?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

अन विराट म्हणतो ‘मैं नही तो कौन बे’

दरम्यान, इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून, व्हिडिओला १.६ मिलियनहुन अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये सृष्टीलाही टॅग करून तू तर आता खूपच फेमस झालीस असं म्हंटलं आहे. तर या Hustle स्पर्धेतील अन्य एक रॅपर एमसी स्क्वेअर यानेही या व्हिडिओवर कमेंट केली आहे.

IND Vs PAK: भारताने चीटिंग केली पण आम्ही…; पाकिस्तानची रडारड सुरु; या Viral Tweets वर तुमचं मत काय?

भारत विरुद्ध पाकिस्तान आयसीसी विश्वचषक सामन्यात विराट कोहलीने ८२ धावांची नाबाद खेळी खेळून भारताला विजय मिळवून दिला. केवळ खेळच नव्हे तर शेवटच्या षटकात डेड बॉलवर विराटने फ्री हिटचा वापर करून घेतलेल्या तीन धावा बघता कोहलीने क्रिकेटच्या नियमांचे ज्ञानही महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले आहे. कोहलीसाठी व त्याच्या चाहत्यांसाठी हा सामना अविस्मरणीय ठरला.

Story img Loader