विराट कोहली हा भारताच्या महान फलंदाजांपैकी एक आहे. आपल्या फलंदाजीने सर्वांची मनं जिंकणाऱ्या विराट कोहलीला जगभरातून प्रेम मिळतं. विराट कोहली त्याच्या फिटनेसबाबत खूप जागरूक असतो. याशिवाय विराट कोहली स्वतः शाकाहारी असल्याचे अनेकदा सांगतो. त्यामुळे एकेकाळी बटर चिकन आवडीने खाणारा हा क्रिकेटर अचानक शाकाहारी आहाराकडे वळल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र, तो आता एका नव्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण विराटने आपल्या स्टोरीमध्ये चक्क बटर चिकन टिक्काचा फोटो पोस्ट केला आहे. या स्टोरीमुळे विराट पुन्हा मांसाहाराकडे वळला की काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराट कोहलीची ही स्टोरी पाहिल्यानंतर चाहत्यांनी त्यांचा स्क्रीनशॉट शेअर करत लिहिले की, भावा, तू शाहाकारी होतास ना… मग तू हे काय करतोस?

विराटच्या या स्टोरीमुळे लोकांमध्ये संभ्रम होता. त्याचवेळी स्पष्टीकरणही येऊ लागले. विराट कोहलीच्या लेटेस्ट पोस्ट केलेल्या स्टोरीत मॉक चिकन टिक्का आहे, जे विविध वनस्पती आधारित घटकांपासून बनवले जाते. ज्यात चिकन किंवा कोणतेही मांसाहारी पदार्थ वापरले जात नाही.

विराट ज्या कंपनीचे मॉक चिकन खात आहे, त्या कंपनीच्या प्रोडक्टचा फोटो लोकांनी पोस्ट केला आणि लिहायला सुरुवात केली.

फिटनेससाठी सोडला मांसाहार

मांसाहार सोडल्याने त्याचा फिटनेस कसा सुधारला हे विराटने स्वतः अनेकदा सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी विराटने मणक्याच्या समस्येमुळे मांसाहार सोडल्याचा खुलासा केला होता. त्याच्या शरीरात खूप जास्त प्रमाणात युरिक अॅसिड तयार होत असल्याने त्याला त्याच्या आहारात काही बदल करावे लागले आणि त्यात मांसाहार सोडणे हा सर्वात मोठा बदल होता.