आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध करुन लोकांना थक्क केले आहे. ChatGPT असो की Midjourney , या चॅटबॉटच्या मदतीने नेहमीच आपल्याला उच्च प्रतिचा कन्टेंट आणि फोटो समोर येतात जे एखाद्या लेखकाला किंवा कलाकाराला लाजवले. आतापर्यंत आपण AI ने तयार केलेले अनेक फोटो पाहिले असतील, उदा. जगातील श्रींमत लोकांचे जीम लूक किंवा ते गरीब असते तर कसे दिसले असते, २१ व्या वर्षी प्रभु रामचंद्र कसे दिसत असतील किंवा ‘महात्मा गांधी’ ते ‘मदर टेरेसा’पर्यंत या दिग्गजांचा सेल्फी घेतला असता तर तो कसा दिसला असता, तसेच ९० वर्षांच्या आजींनी स्केटिंग केलं असते तर त्या कशा दिसल्या असत्या. असे AI ने तयार केलेले काही फोटो आपल्या समोर आले आहेत.

आता तुम्ही कधी कल्पना केली नसेल असे फोटो AI पुन्हा आपल्यासमोर घेऊन येत आहे. तुम्ही कधी कल्पना केली आहे का की विराट कोहली किंवा महेंद्रसिंह धोनी हे महिला असले असते तर कसे दिसले असते? तुम्हाला ही कल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते पण तरीही ते खरचं कसे दिसले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही वाटत असेल? होय ना! काळजी करु नका हे काम AI ने सोपे केले आहे. एआयने काही क्रिकेटर्सचे फोटो तयार केले आहेत ज्यामध्ये ते महिला असते तर कसे दिसले असते याची झलक तुम्हाला पाहता येईल.

SK MD अबू साहिदने शेअर केले क्रिकेटपटूंचे महिलांच्या रुपातील फोटो

आता, कलाकार SK MD अबू साहिद यांनी मिडजर्नीचा वापर करून भारतीय क्रिकेटपटू महिला म्हणून कसे दिसतील अशी कल्पना करुन फोटो तयार केले आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये क्रिकेटपटूंच्या महिलांच्या रुपातील फोटोंचा समावेश आहे . साहिदने क्रिकेटपटूंच्या महिलांच्या नावांचाही समावेश केला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा – ब्युटी ब्लॉगरने लाल मिर्ची पावडरचे बनवले लिप ग्लॉस, ओठांवर लावताच झाली आग; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले

महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली ते गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजा यांचे फोटो केले शेअर

या यादीमध्ये महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली ते गौतम गंभीर आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. हे क्रिकेटरची स्त्री रुपातील ही झलग अगदी वास्तविक वाटत आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “एआय लिंग बदलून व्यक्तीचे फोटो तयार करते. Midjourney AI वापरून भारतीय क्रिकेटपटूंचे असे फोटो तयार केले आहेत.

हेही वाचा – सिधी बात, नो बकवास! ‘कामात मजा येईना’ म्हणत पठ्याने सोडली नोकरी, हर्ष गोयंका म्हणाले, ”ही तर…”

लोकांनी दिल्या मजेशील प्रतिक्रिया
या पोस्टला आतापर्यंत २ हजारपेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे तर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. लोक हे फोटो पाहून, त्यांचे कौतूक करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत. कित्येक लोकांनी कमेट केली की, ”फरक जाणून घेण्यासाठी त्यांना पोस्ट पुन्हा पाहावी लागली.”

एका इंस्टाग्राम यूजरने कमेंटमध्ये सांगितले की, ”हे पाहून माझा विश्वास बसला आहे की कोणताही पुरुष फक्त मेकअपचा पुर्ण वापर करुन स्वत:ला एक महिलेच्या रुपात बदलू शकतो.” तर दुसरा म्हणाला की गौतमी सारा अली खान सारखी दिसते आहे.

तुम्हाला हे फोटो पाहून काय वाटले? आम्हाला नक्की कळवा

Story img Loader