आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच AI आपली क्षमता वेळोवेळी सिद्ध करुन लोकांना थक्क केले आहे. ChatGPT असो की Midjourney , या चॅटबॉटच्या मदतीने नेहमीच आपल्याला उच्च प्रतिचा कन्टेंट आणि फोटो समोर येतात जे एखाद्या लेखकाला किंवा कलाकाराला लाजवले. आतापर्यंत आपण AI ने तयार केलेले अनेक फोटो पाहिले असतील, उदा. जगातील श्रींमत लोकांचे जीम लूक किंवा ते गरीब असते तर कसे दिसले असते, २१ व्या वर्षी प्रभु रामचंद्र कसे दिसत असतील किंवा ‘महात्मा गांधी’ ते ‘मदर टेरेसा’पर्यंत या दिग्गजांचा सेल्फी घेतला असता तर तो कसा दिसला असता, तसेच ९० वर्षांच्या आजींनी स्केटिंग केलं असते तर त्या कशा दिसल्या असत्या. असे AI ने तयार केलेले काही फोटो आपल्या समोर आले आहेत.
आता तुम्ही कधी कल्पना केली नसेल असे फोटो AI पुन्हा आपल्यासमोर घेऊन येत आहे. तुम्ही कधी कल्पना केली आहे का की विराट कोहली किंवा महेंद्रसिंह धोनी हे महिला असले असते तर कसे दिसले असते? तुम्हाला ही कल्पना ऐकायला थोडी विचित्र वाटू शकते पण तरीही ते खरचं कसे दिसले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही वाटत असेल? होय ना! काळजी करु नका हे काम AI ने सोपे केले आहे. एआयने काही क्रिकेटर्सचे फोटो तयार केले आहेत ज्यामध्ये ते महिला असते तर कसे दिसले असते याची झलक तुम्हाला पाहता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा