Virat Kohli Candid Interview: अफलातून फलदांजी व भन्नाट आत्मविश्वासाच्या बळावर विराट कोहलीने आपले नाव जगाच्या इतिहासात कोरले आहे. शतकाधीश सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून कोहलीने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात आपले ५० वे शतक नोंदवले आहे. विराट कोहलीच्या फलंदाजी इतकेच चाहते त्यांच्या फिटनेसचे व त्याच्या एकूणच क्लासी लुकचे आहेत. विराट कोहली हा दोन पिढ्यांमधील सर्वात हॅण्डसम खेळाडू आहे असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही, किंबहुना अशी चर्चा सोशल मीडियावर नेहमीच चालू असते. पण तुम्हाला माहितेय का एक अशी वेळ होती जेव्हा विराट कोहलीला स्वतःच्या दिसण्याविषयी कमीपणा वाटला होता. एका जुन्या मुलाखतीत विराटने आपल्याला स्वतःला आरशात पाहिल्यावर काय वाटले होते याविषयी सांगितले आहे.
विराट कोहलीच्या जुन्या मुलाखतीतील एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. यात कोहली म्हणतो की, “मी एकदा मला स्वतःला आरशात पाहिले होते आणि मला असं वाटायला लागलं की जर तुला एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून लोकांनी गांभीर्याने घ्यायला हवे असेल तर तुला हे असं दिसून चालणार नाही. तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी. मग बस त्याच क्षणापासून माझा फिटनेसचा प्रवास सुरु झाला, माझं डाएट बदललं, मी जिममध्ये २-२ तास घालवायला लागलो, एकही दिवस माझा चीट डे नसायचा, आठवड्यात फक्त एकदा सुट्टी असायची आणि मग जवळपास माझं ६ ते ७ किलो वजन कमी झालं. तिथपासून मग ते व्यसनच लागलं, कारण त्याचा परिणाम की मैदानात बघ होतो. मला वेग वाढल्याचं जाणवत होतं”
Video: विराट कोहली म्हणाला, “मला व्यसनच लागलं..”
हे ही वाचा<< मोहम्मद शमीविरुद्ध ट्रोलिंग ‘हा’ पाकिस्तानचा ‘फूट पाडण्याचा अजेंडा’? पाच विकेट घेऊनही ‘या’ मुळे आला होता वादात
दरम्यान, विराट कोहलीने फिटनेसच्या प्रवासात विराट कोहलीने सगळ्यात मोठा निर्णय हा शाकाहारी होण्याचा घेतला होता आणि त्यामुळे सुद्धा खूप मदत झाल्याचे त्याने वेळोवेळी सांगितले आहे. यंदाच्या आशिया चषकात व आत अत्यापाठोपाठ चालू असणाऱ्या विश्वचषकात कोहलीचा सगळ्यांनी पहिला आहे. याच फॉर्मच्या व फिटनेसच्या बळावर यावर्षी भारताला विश्वविजेता बनवण्यासाठी अंतिम टप्यात कोहलीची जादू चालणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.