Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिकडे टीम इंडियाला एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधी संघ लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळत आहे. या सामन्यात भारताकडून कमलेश नागरकोटीसह अनेक युवा खेळाडूही मैदानात उतरले आहेत. या सामन्यादरम्यान नागरकोटी क्षेत्ररक्षण करत असताना काही प्रेक्षकांनी त्याच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची खिल्ली उडवली.
ही घटना पाहून माजी कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रुमच्या कॉरिडॉरमध्ये उभ्या असलेल्या प्रेक्षकांना लगेचच दटवले. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराट आणि मॅच पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये एक मिनिटापेक्षा जास्त वेळ वादावादी झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. विराट कोहलीने आपल्या सहकारी खेळाडूंसाठी प्रेक्षकांना बोलल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही विराट कोहलीने मैदानावर स्लेजिंग करणाऱ्या प्रेक्षकांना बोलून दाखवलं आहे.
(हे ही वाचा: मारामारी करताना दोन बैल घुसले शोरूममध्ये, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल)
(हे ही वाचा: Video: जग घुमिया चाय! ‘या’ राजस्थानी मास्टरशेफचं कौशल्य पाहून तुम्हीही कराल कौतुक)
सराव सामन्याबद्दल बोलायचे झाले तर कमलेश नागरकोटीला सामन्याच्या पहिल्या डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या डावात त्याने एक विकेट घेतली. याशिवाय विराट कोहलीही फलंदाजीत चांगल्या लयीत दिसला. पहिल्या ६९ चेंडूत ३३ धावा करून कोहली बाद झाला. त्याचवेळी दुसऱ्या डावातही त्याने दमदार अर्धशतक झळकावले. दुसऱ्या डावात विराट कोहलीने ९८ चेंडूत ६७ धावा केल्या.