Virat Kohli- Tamannaah Bhatia Flirting Video: अभिनेत्री अनुष्का शर्माशी लग्न करण्यापूर्वी विराट कोहलीचे नाव अनेक अभिनेत्री आणि मॉडेल्ससह जोडले गेले होते. या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तमन्ना भाटिया. खरंतर, लस्ट स्टोरीजच्या दरम्यान जेव्हा तमन्ना आणि विजय वर्मा यांनी आपल्या रिलेशनशिपबाबत उघडपणे सांगितलं होतं तेव्हा सुद्धा तमन्ना आणि विराटच्या डेटिंगच्या जुन्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यानंतर आता दोघांच्या फॅन्सकडून आता, विराटचा तमन्ना भाटियाचा एक जुना व्हिडिओ व्हायरल केला जात आहे
विराट कोहली आणि तमन्ना भाटिया यांचा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर चांगलाच चर्चेत आला आहे. तुम्ही बघू शकता यामध्ये माजी भारतीय कर्णधार अभिनेत्री तमन्नासह ‘फ्लर्टिंग’ करताना दिसत आहे. अनुष्का शर्माशी लग्नापूर्वी विराट आणि तमन्नाने एका जाहिरातीत एकत्र काम केले होते. या जाहिरातीमुळे त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु दोघांनी कधीही जाहीरपणे त्यांच्या नात्याची पुष्टी केली नव्हती.
साधारण दहा वर्षे जुना असलेला व्हायरल व्हिडिओ, विराट कोहली तमन्ना भाटियाकडे जाताना, तिचा नंबर विचारताना, गप्पा सुरू करताना आणि फ्लर्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक नेटिझन्सनी गमतीत अनुष्का शर्माला सुद्धा व्हिडिओमध्ये टॅग केले. तर कोहलीचा या व्हिडिओतील अभिनय पाहून अनेकांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची विनंती सुद्धा केली आहे.
Video: विराट कोहली- तमन्ना भाटिया
हे ही वाचा<< KBC च्या ५० लाख रुपये विजेत्या महसूल अधिकारी ‘अमिता’ यांनी प्रशासनाला सुनावलं; राजीनामा दिला, पण २४ तासात…
दरम्यान यापूर्वी, तमन्नाने एका मुलाखतीत स्पष्टीकरण देत विराटसह नाव जोडण्याबाबत भाष्य केलं होतं, “लोकांना खरं काय माहीत असावं, अशी माझी इच्छा आहे. मी आणि विराट जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान फक्त चार शब्द बोललो. त्यानंतर मी विराटला कधीही भेटले नाही. पण माझ्याबरोबर काम करणाऱ्या अनेक अभिनेत्यांपेक्षा तो उत्तम अभिनय करतो,” असं ती म्हणाली होती. लस्ट स्टोरीज २ नंतर आता तमन्नाने सुद्धा विजय वर्मासह रिलेशनवर शिक्कामोर्तब केलं आहे.