विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर निर्भेळ यश संपादन केलं. टी-२०, वन-डे आणि कसोटी मालिकेत भारताने यजमानांना व्हाईटवॉश दिला. १५ सप्टेंबरपासून भारत घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. मात्र ही मालिका सुरु होण्याआधी विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मासोबत बीचवर निवांत वेळ घालवत आहे. विराटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनुष्कासोबतचा HOT फोटो पोस्ट केला आहे.
विराट नेमक्या कोणच्या बीचवर आहे, हे त्याने सांगितलं नसलं तरीही त्याच्या या फोटोला नेटीझन्सनी चांगलीच पसंती दर्शवली आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारत ३ टी-२० आणि ३ कसोटी सामने खेळणार आहे.