Rs 10 Note Viral Again: काही दिवसांपूर्वी १० रुपयांची नोट चर्चेत आली होती, ज्यावर लिहिले होते, ‘विशाल, माझे लग्न २६ एप्रिलला आहे. मला इथून घेऊन जा. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझी कुसुम.’ ही नोट व्हायरल झाल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्स केल्या. सोशल मीडिया यूजर्स असेही म्हणू लागले की, भाऊ कुसुमचा हा मेसेज लग्नाआधी विशालपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून तो त्याला २६ एप्रिलपूर्वी तो तिला पळवून घेऊन जाईल. हा ट्रेंड अजून संपला नव्हता की आणखी एक १० रुपयांची नोट व्हायरल होऊ लागली, ज्यावर विशालचे उत्तर आहे.

विशालचे उत्तर शेवटी आलेच!

सोशल मीडियावरही आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नाला जेवढा उत्साह आला नसेल तेवढा उत्साह नेटकऱ्यांना विशालच्या कुसुमला भेटवण्यासाठी आला आहे हे दिसून येते. जर तुम्हाला त्यांची प्रेमकहाणी माहीत नसेल, तर तुम्हाला संपूर्ण प्रकरण समजून घ्यावे लागेल. काही दिवसांपूर्वी कुसुमने तिचा प्रियकर विशालसाठी १० रुपयांच्या नोटेवर संदेश लिहिला होता, जो इंटरनेटवर व्हायरल झाला होता. आता ट्विटरवर १० रुपयांच्या नोटेचे आणखी एक फोटो समोर आला आहे, विशालने कुसुमला पाठीमागे निळ्या पेनने लिहून उत्तर दिले आहे.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
fake power of attorney marathi news
सोलापूर : नामसाधर्म्याचा फायदा घेऊन बनावट कुलमुखत्यारपत्राद्वारे फसवणूक
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…

(हे ही वाचा: पाटण्यात फोनवर बोलत असताना महिला मॅनहोलमध्ये पडली; धक्कादायक घटनेचा Video Viral)

‘हे’ आहे विशालचे उत्तर

या चिठ्ठीवर उत्तरात लिहिले होते, ‘कुसुम, मला तुझा संदेश मिळाला आहे. मी तुला घ्यायला येईन. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझा विशाल.’ हे आश्चर्यकारक नाही का? दोन प्रेमी एकमेकांना भेटू शकतील की नाही हे पाहण्यासाठी इंटरनेट आता २६ एप्रिलची वाट पाहत आहे. जर ते भेटले तर विशालला त्याची मैत्रीण कुसुमला घेऊन दूर जाता येईल का?

(हे ही वाचा: Video: कधी जमिनीवर पडून तर, कधी उड्या मारत शुटिंग; असा कॅमेरामन तुम्ही बघितलाच नसेल)

(हे ही वाचा: डेव्हॉन कॉनवेच्या प्री-वेडिंग पार्टीमध्ये पारंपारिक कपडे घालून थिरकली CSK ची टीम; व्हिडीओ होतोय viral)

या कथेमागील सत्य काय आहे हे सध्या तरी कोणालाच माहीत नाही. खरंच कुणी कुसुम आहे का, जिने तिचा प्रियकर विशालला मेसेज लिहिला की ती फक्त व्हायरल कंटेंट आहे. यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader