Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी भन्नाट जुगाड सांगताना दिसतो तर कधी कोणी हटके गोष्टी शेअर करताना दिसतो. महाराष्ट्र पोलीस भरतीच्या एका पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विश्वास नांगरे पाटील सुंदर कविता म्हणताना दिसतात.
डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून विश्वास नांगरे पाटील ओळखले जातात. अनेक तरुण त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या भाषणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असेच एका कार्यक्रमात भाषण देताना ते सुरेश भटांची कविता सादर करतात. ही कविता तुम्हाला जगण्याची एक नवीन उमेद देते. सध्या त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,.
अजुन अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..
येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही..”
या व्हिडीओवर लिहिलेय, “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
maharastra_policebharti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खुप भारी कविता” तर एका युजरने लिहिलेय, “छान कविता सुंदर सादरीकरण सर मी नाशवंत नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “असे शब्द ऐकले तर पुन्हा लढायला ताकद येते” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.