famous shiva temple in pune : महादेव हे सनातन संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे देव आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिमूर्तीपैकी एक देव आहे म्हणूनच त्याला देवांचा देव महादेव असेही म्हणतात. शंकर, महेश, रुद्र, नीलकंठ, गंगाधर इत्यादी अनेक नावांनीही त्यांना ओळखले जाते. शिव हे हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक आहे. विनाशाची देवता म्हणून भगवान शंकराला ओळखले जाते. शंकराचे त्यांच्या सौम्य रूपासाठी आणि त्यांच्या उग्र रूपासाठी प्रसिद्ध आहेत. भक्तांच्या सर्व मनोकामना करणाऱ्या भोळ्या शंकराला भोलेनाथ असेही म्हणतात. शिव हा विश्वाच्या निर्मितीचा, अस्तित्वाचा आणि विनाशाचा स्वामी आहे. कैलासाचा स्वामी असलेल्या शिवाच्या नियंत्रणात लय आणि विनाश दोन्ही असतात. रावण, शनी, कश्यप ऋषी इत्यादी त्यांचे भक्त राहिले आहेत. शिव सर्वांना समानतेने पाहतो, म्हणून त्याला महादेव म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज महाशिवरात्रीनिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. महाशिवरात्रीनिमित्त शंकराचे भक्त उपवास करतात. जवळच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला अभिषेक करतात, त्याची मनोभावे पुजा करतात. देशभरामध्ये भगवान शंकारची अनेक प्रसिद्ध मंदिरे आहेत. दरम्यान, आज पुण्यातील प्रसिद्ध मंदिराची यादी येथे दिली आहे. तुम्हीही जर भगवान शंकराचे भक्त असाल तर आज महाशिवरात्रीनिमित्त तुमच्या जवळच्या शिव मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता .चला तर मग जाणून घेऊ या….

पुण्यातील शिव मंदिराची यादी

१. पुण्याधाम आश्रम (कोंढवा)
२. चातूर्मुख (पाठरवडी)
३. महादेव मंदिर (पिंपळे सौदागर पीसीएमसी)
४. बाणेश्वर मंदिर ( बाणेर)
५. तारकेश्वर (येरवडा)
६. घोराडेश्वर (तलेगाव)
७. नागेश्वर (सोमवार पेठ)
८ रुद्रेश्वर (हडपसर)
९ संगमेश्वर (सासवड)
१०. महादेव मंदिर (वाकडगाव-२ ओमकार कॉलनी, डांगे चौक रोड )
११. पाताळेश्वर लेणी (जेएम रोड)
१२. केदारेश्वर (कसबा पेठ)
१३. वाघेश्वर(वाघोली)
१४. बनेश्वर (तळेगांव दाभाडे)
१५. श्री सोमेश्वर मंदिर (पाषाण पुणे)
१६. ओंकारेश्वर (शनिवार पेठ पुणे)
१७. संगमेश्वर (सासवड)

हेही वाचा – जर तुमच्या बाळाचा जन्म महाशिवरात्रीला झाला असेल तर महादेवाच्या नावावरून ठेवा त्याचे नाव…

हेही वाचा – महाशिवरात्री राशिभविष्य व पंचांग: ८ मार्चचा दिवस मेष ते मीनपैकी कुणाला शिवशंकराची कृपा लाभणार? पाहा तुमची रास

पुण्यातील हे शिव मंदिर अत्यंत सुंदर आहेत. येथील वातावरण देखील शांत आणि भक्तीमय आहे. आज महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरामध्ये भक्तांची भरपूर गर्दी असेल. एखाद्या सुट्टीच्या दिवशी देखील पुण्यातील या मंदिराना तुम्ही निंवात भेट देऊ शकता. येथील मंदिराची रचना आणि स्थापत्य याचा अनुभव घेऊ शकता.