येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या बालस्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. यानिमित्त्याने अयोध्येसह संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. सगळीकडे जल्लोष साजरा केला जात आहे. १०० वर्षाहून अधिक काळ ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होतो तो आता संपुष्टात आला असून या उद्घाटनामुळे एक नवी सुरूवात होणार आहे. या दिवशी संपूर्ण देश दिवे लावून दिवाळी साजरी करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरीकांना २२ जानेवारी रोजी अयोध्येत न येण्याचे आवाहन केले होते. मोदी म्हणाले होते की प्रत्येकाला त्याच दिवशी अयोध्येत येणे शक्य नाही. अयोध्येत सर्वांचे येणे कठीण आहे. त्यामुळे देशातील सर्व राम भक्तांना विनंती आहे की त्यांनी २२ जानेवारी रोजी अयोध्येत येऊ नये. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार अयोध्येत येऊ शकता.
२२ तारखेला अयोध्येला जाणे शक्य नाही पण तुम्ही महाराष्ट्रातील या एका राम मंदिराला भेट देऊ शकता. आज आपण त्या मंदिराविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
काळाराम मंदिर, नाशिक
काळाराम मंदिर हे नाशिक येथील पंचवटीमध्ये स्थित आहे. काळ्या दगडात हे मंदिर वसलेले आहे. प्रभू राम वनवासादरम्यान ज्या ठिकाणी राहिले तिथेच हे मंदिर असल्याची अख्यायिका सांगितली जाते. १९७२ मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधले होते. हे मंदिर बांधायल जवळपास १२ वर्षे लागली. पश्चिम भारतातील रामाचे हे सर्वात आधुनिक मंदिर मानले जाते. या मंदिरात प्रभू राम, सीता आणि लक्ष्मणच्या काळ्या दगडात कोरलेल्या दोन फुटाच्या मुर्ती आहेत.
हेही वाचा : Video : लग्नात मंगलाष्टके गाताना ब्राम्हणाचा सूर पाहून पाहूण्यांना हसू आवरेना, पाहा मजेशीर व्हायरल व्हिडीओ
राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी तुम्ही या मंदिराला भेट देऊ शकता. या पंचवटी परीसरात तुम्ही राम कुंड, सीता गुफा अशा अनेक रामायणात दाखवलेल्या ठिकाणांना भेट देऊ शकता.
पुणे ते नाशिक हे अंतर फक्त पाच तासाचे आहे त्यामुळे तुम्हाला नाशिकच्या या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही पुण्याहून बसनी जाऊ शकता.
सोशल मीडियावर काळाराम मंदिराचे अनेक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत असतात. अनेक भाविक, रामभक्त या मंदिराला भेट दिल्यानंतर तेथील व्हिडीओ शेअर करत असतात. नाशिक हे अत्यंत सुंदर शहर आहे. तुम्ही २२ जानेवारीला नाशिकला जाऊन या खास राम मंदिराला भेट देऊ शकता.