Maha Shivratri: महाशिवरात्र (Maha Shivratri) हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. हा सण संपूर्ण भारतात आनंदाने आणि उत्साहात साजरा होतो. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची उपासना केली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी (बुधवारी) रोजी साजरी केली जात आहे. या दिवशी महादेवांची मनोभावे पूजा-आराधना केली जाते. शिव भक्त या दिवशी व्रत करून महादेवाच्या मंदिराला भेट देतात. जर तुम्ही पुण्यातील असाल तर तुम्ही महाशिवरात्रीला पुण्यातील श्री महादेवाची ५ सुंदर अशा मंदिरांना भेट देऊ शकता.
पुणे हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरात अनेक प्राचीन महादेवाची मंदिरे आहेत. या मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता.
सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील महादेवाची सुंदर मंदिरांविषयी माहिती सांगितली आहे. या मंदिरांना तुम्ही भेट देऊ शकता.
१. श्री धारेश्वर मंदिर, धायरी
धायरी गावातील धारेश्वराचं मंदिर हे शिवमंदिर अतिशय सुंदर आहे. औदुंबर, पिंपळ आदी वृक्षांनी या मंदिराचा परिसर आणखी आकर्षक दिसतो.
२. शिव मंदिर, वाकड
पुणेच्या वाकड येथील शिव मंदिराला तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी भेट देऊ शकता.
३. महादेव मंदिर, पिंपळे सौदागर
पिंपळे सौदागरातील पवनेच्या काठावर वसलेले शिवकालीन शिवमंदिर अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे.
४. चतुर्मूख महादेव मंदिर, दारेवाडी
या सुंदर मंदिराला सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता.
५. वाघेश्वर महाराज मंदिर, चऱ्होली
वाघेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील चऱ्होली बुद्रुक येथील ऐतिहासिक मंदिर आहे. हे शिवमंदिर पुणे शहरापासून १६ किमी अंतरावर असलेल्या वाघोली गावात आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
pune_captures या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हर हर महादेव” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पर्वती टेकडी महादेव मंदिर , कोथरुड मृत्युंजय ईश्वर मंदिर” तर एका युजरने लिहिलेय, “सोमेश्वर मंदिर सोमेश्वरवाडी ( पाषाण )” आणखी एका युजरने लिहिलेय, “धनेश्वर महाराज प्राचीन शिवालय ..चिंचवड गाव .” अनेक युजर्सना हा व्हिडीओ आवडला.