यंदाचा नवरात्रोत्सव उत्साहात आणि जल्लोषात देशभर साजरा केला जात आहे. गरबा-दांडियावर नृत्य करण्याचा आनंद अनेकजण घेत आहे. सोशल मीडियावर अनेक गरबा दांडियाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही जर सोशल मीडियावर सातत्याने वापरल असाल असाल तर सध्या व्हायरल असलेले ‘खलासी’ हे गाणे नक्कीच ऐकले असेल. सध्या हे गाणे तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येक जण या गाण्यावर नाचताना दिसत आहे. पण तुम्ही खलासी गाण्याचे कार्टुन स्वरुप ऐकले आहे का? नसेल ऐकले तर एकदा हा व्हिडीओ नक्की पहा.
‘खलासी’ गाणे सध्या तुफान चर्चेत आहे. आता शिन-चॅनच्या आवाजातील खलासी हे गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आंकाक्षा शर्मा ही तरुणी शिन-चॅन या कार्टुन पात्राला आवाज देणारी व्यक्ती देते तुमच्यापैकी अनेकांना माहित असेलच. आंकाक्षा ही एक प्रसिद्ध व्हॉईस आर्टिस्ट आहे. सोशल मीडियावर नेहमी तिचे व्हिडीओ पोस्ट करत असते. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
हेही वाचा – रिल्ससाठी भररस्त्यात नाचत होती तरुणी, मद्यपीने केली तिची नक्कल; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही
‘खलासी’ गाण्याची वाढती लोकप्रियता पाहून शिन-चॅनला म्हणजेच आकांक्षालाही हे गाणे गाण्याचा मोह आवरता आला नाही. आकांक्षाने शिन-चॅनच्या आवाजात हे गाणे गायले असून त्याचा व्हिडीओ इंस्टाग्राम शेअर केला आहे. शिन-चॅन या पात्राच्या चाहत्यांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. शिन-चॅनच्या आवाजातील ‘खलासी’ हे गाणे ऐकून अनेकांना हसू आवरत नाही. सोशल मीडियावर आकांक्षाचे कौतूक होत आहे. लोकांनी व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
हेही वाचा – निष्काळजीपणे बाईक चालवत होती तरुणी, स्वत:ही पडली अन् इतरांनाही पाडले; व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
एकाने हा व्हिडीओ पाहून, “शिन-चॅन पटेल” असे म्हटले तर दुसऱ्याने म्हटले की, “काही समजले नाही पण मज्जा आली”
तिसरा म्हणाला, “आता शिन-चॅन देखील फाफडा, जलेबी आणि खमंन ढोकला खात असेल”
चौथा म्हणाला, AI च्या काळात जे लोक दुसऱ्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात ते खरे ‘हिरे’ आहेत. पाचवा म्हणाला, “शिन-चॅन गुजराती.” सहावा म्हणाला, “शिन-चॅन जगातील सर्वोत्तम गायक आहे.” सातवा म्हणाला, “फार गोंडस, गुजराती सिनचॅन”
हेही वाचा – अनेकांच्या आवडीचे कार्टून पात्र असलेल्या शिनचॅनला आवाज देणारी व्यक्ती आहे तरी कोण? जाणून घ्या
शिन-चॅन कार्टून
शिन-चॅन हे कार्टून पात्र लहानांपासून मोठ्यामध्ये लोकप्रिय आहे. शिन-चॅन हे योशितो उसुई यांनी लिहिलेले आणि चित्रित केलेले कार्टुन पात्र आहे. या पात्राने १९९० मध्ये ‘वीकली मांगा ऍक्शन’ नावाच्या जपानी साप्ताहिक मासिकात पहिल्यांदा दिसले होते. नंतर त्याची कार्टून मालिकाही बनवण्यात आली. त्या काळात शिन-चॅन ही जपानी मंगा मालिका (Japanese manga series) खूप लोकप्रिय होती