Vote Jihad Controversy Video: एक पोलीस अधिकारी बुरखा घातलेल्या एका मुस्लिम व्यक्तीला पकडताना दाखवणारा एक व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहे. संबंधित व्यक्ती बनावट मतदान करण्यासाठी बुरख्याचा वापर करीत होता, असा दावा आहे. युजर्सनी या प्रकरणाला ‘व्होट जिहाद’ म्हटलेले आहे. मंगळवारी उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद आणि त्यांची भाची मारिया आलम यांच्याविरुद्ध ‘व्होट जिहाद’ हा शब्द वापरण्यावरून गुन्हा दाखल केला होता, मारिया यांनी “सरकारला हटवण्यासाठी व्होट जिहाद हा एकमेव मार्ग आहे.” असे म्हणत फारुखाबाद लोकसभा जागेवरून इंडिया ब्लॉकच्या उमेदवारासाठी मत मागितले होते. त्यानंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. मोदींनी सुद्धा या विधानावर टीका करत हा लोकशाहीचा अपमान असल्याचे म्हटले आहे. पण सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओचा याच्याशी संबंध आहे का हे एकदा पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
तपास:
न्यूजचेकरने प्रथम व्हिडिओच्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला, ज्यावरून १९ जून २०२३ ला अपलोड झालेला पूर्ण व्हिडीओ आम्हाला पाहायला मिळाला. अशीच एक पोस्ट १८ जून २०२३ ला सुद्धा करण्यात आली होती. यातून पुष्टी होते की व्हायरल व्हिडीओ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा आहे, तसेच तो पाकिस्तानचा आहे.
आम्ही पाहिले की भिंतीवर (डावीकडे) पोलिस अधिकारी आणि बुरखा घातलेला माणूस यांच्या मागे कॅपिटल सिटी पोलिस लाहोरचा लोगो आहे.
हे ही वाचा<< नरेंद्र मोदीच म्हणाले, भाजपा भारताला मजबूत करू शकत नाही?, १४ सेकंदांच्या Video मुळे खळबळ, तेव्हा नेमकं घडलं काय?
संबंधित कीवर्ड शोधल्यावर आम्हाला लाहोर पोलिसांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर दिनांक १८ जून २०२३ रोजी केलेली पोस्ट आढळून आली. त्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील घटनेची माहिती आहे. यामुळे सदर व्हिडीओ सध्याच्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही हे स्पष्ट आहे.
निष्कर्ष: पोलीस अधिकारी बुरखा घातलेल्या माणसाला पकडतानाचा व्हायरल व्हिडिओ २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील नसून पाकिस्तानचा आहे.
सौजन्य: न्यूजचेकर
अनुवाद : अंकिता देशकर