भारतात अशी काही धार्मिक स्थळं आहेत, जिथे माकडांचा मोठ्या संख्येने वावर दिसून येतो, माणसांच्या गराड्यात ती माकडं अगदी सहजपणे वावरत असतात. पण, काही वेळा माकडं लोकांना अशा काही रीतीनं पिडतात की ते पाहून कित्येकदा आपल्याला रागाबरोबरच हसूही येते. ती भूक लागली की, कधी कोणाच्या हातातील खाद्यपदार्थ खाऊन पळत सुटतात, तर कधी लोकांच्या मोबाईलसह अशी एखादी वस्तू घेऊन पळतात की, ती त्यांच्याकडून परत मिळविताना नाकीनऊ येतात, अशाच प्रकारे एका माकडानं व्यक्तीच्या डोळ्यांवरील चष्मा घेऊन पळ काढला. त्यावेळी त्या व्यक्तीनं माकडाला पाणी दिलं, फळ दिलं तरी त्यानं चष्मा सोडला नाही. पण, त्यानंतर त्यानं अशी एक गोष्ट त्या माकडाला दिली; ज्यानंतर त्यानं काही मिनिटांत चष्मा व्यक्तीकडे फेकला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कृष्णदेवाची नगरी मथुरा आणि वृंदावन येथील अनेक मंदिरांमध्ये आणि तेथील परिसरात अनेक माकडं असतात. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, मथुरेतल्या मंदिराजवळील एका इमारतीच्या बाल्कनीत एक माकड एका व्यक्तीचा चष्मा घेऊन पळताना दिसलं. त्याच वेळी खाली उभे असलेले लोक माकडाकडून चष्मा काढून घेण्याचा प्रयत्न करीत होते.
ट्रेनमधून विना तिकीट प्रवास करताना पकडला गेला तर…; १ एप्रिलपासून रेल्वेच्या सुविधेत मोठा बदल
चष्मा परत मिळविण्यासाठी खाली उभे असलेले लोक त्याला कधी सफरचंद देतात; तर कधी पाण्याची बाटली देतात. पण या सर्व गोष्टी तो खाली फेकून देतो. शेवटी माकडाकडे फ्रूटी फेकली गेली; जी घेताच, माकड काही मिनिटांत चष्मा खाली फेकतं. हा व्हिडीओ @mrs_rauthan नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्सनही मजेशीर कमेंट्स करीत आहेत.