Vulgar dance video: सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. अनेक कार्यक्रम वा पार्टीमध्ये डान्स परफॉर्मन्स, गाणी अशा विविध गोष्टींचं आयोजन केलं जातं. आपल्या धकाधकीच्या जीवनात थोडं वेगळेपण यावं, तसंच सगळ्यांना याचा आनंद घेता यावा हेच याचं मुख्य कारण असतं. पण, आजकाल अनेकदा अशा कार्यक्रमांमध्ये अश्लील डान्सचं आयोजन केलं जातं. अशा कार्यक्रमांमध्ये अनेकदा गैरप्रकार, गैरवर्तणूक होताना दिसते. सध्या असाच काहीसा प्रकार एका कार्यक्रमात घडला आहे, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नईतील एका वैद्यकीय परिषदेत एका महिलेचा डान्स आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या व्हायरल व्हिडीओत चक्क काही डॉक्टर्स महिलेच्या डान्सवर शिट्या मारताना आणि तिचा हात पकडून तिच्याबरोबर थिरकताना दिसतायत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय.

हेही वाचा… धक्कादायक! भरबाजारात महिलेने बॅग उघडली अन् केलं असं काही की…, VIDEO पाहून व्यक्त कराल संताप

व्हायरल व्हिडीओ

असोसिएशन ऑफ कोलन अॅण्ड रेक्टल सर्जन ऑफ इंडियाची वार्षिक परिषद चेन्नई येथे १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान पार पडली. या परिषदेसाठी अनेक डॉक्टर्स जमले होते. परिषदेमध्ये एका महिलेचा डान्सही ठेवण्यात आला होता. ती महिला अतिशय अश्लील डान्स स्टेप्स करीत सगळ्यांसमोर थिरकताना दिसली. ती डान्स करत असताना अनेक डॉक्टर्स जागेवरून उठून तिच्यासह थिरकायला पुढे आले. महिलेने डान्स सुरू करताच एक माणूस हातात ग्लास घेऊन तिच्यासह थिरकू लागला. महिलेचा डान्स पाहून अनेकांनी शिट्ट्याही वाजवल्या.

‘Ra Ra Rakkamma’ या कन्नड गाण्यावर महिला ठेका धरताना दिसली. महिला डान्स करीत असताना तिने एका माणसाला आग्रह केला, असं या व्हिडीओतून दिसून येतंय. आग्रह करताच तो महिलेचा हात पकडून, तिला गोल फिरवून तिच्यासह थिरकायला लागतो. तसंच अनेक जण हातात ड्रिंक्स घेऊन महिलेचा डान्स एन्जॉय करताना दिसतायत.

हा व्हिडीओ @ginger_bread_s या x अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “मला यातून हे जाणून घ्यायचे आहे की, @IMAIindiaOrg हे मानवी शरीरशास्त्रातील काही प्रकारचे प्रशिक्षण आहे का? डॉक्टरांनी सार्वजनिक ठिकाणी महिलांना पकडणे हा कोणत्या औषधोपचाराचा भाग आहे?” असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं होतं.

हेही वाचा… VIDEO: “देव कोणत्या रूपात…”, जिममध्ये अचानक एकावर पडला डंबेल अन्…, पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप

व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खरं तर लोकांना याचं जास्त आश्चर्य वाटलं की, एका मेडिकल इव्हेंटमध्ये अशा प्रकारचा अश्लील डान्स झाला. “अतिशय लज्जास्पद”, “खूप क्रिंज”, “कोणत्याही कार्यक्रमात असा डान्स पाहून लाज वाटेल” अशा प्रकारच्या कमेंट्स अनेकांनी या व्हिडीओवर केल्या; तर काही लोकांना यात काहीच गैर वाटलं नाही. “ते डॉक्टर आहेत, त्यांनी आयुष्यभर कठोर परिश्रम आणि संघर्ष केला आहे. त्यांनी थोडंसं एन्जॉय केलं तर काय झालं” अशीही कमेंट एकानं केली. तर, “डॉक्टर्स मजा करू शकत नाही?”, अशी कमेंटही एकानं केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vulgar dance at doctors conference in chennai video viral on social media dvr