लग्न करायचं म्हटलं की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात. प्रत्येक मुलाला सुंदर बायको हवी असते. तसेच मुलींच्याही आपला नवरा कसा असावा, याबाबतच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना तर बायको सुंदर हवी असतेच पण त्यासोबत हुंडादेखील घ्यायचा असतो. सध्याची परिस्थिती पाहायला गेलं तर, लग्नासाठी मुली मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळे हुंडा घ्यायचा प्रश्नच निर्माण होत नाही, “आम्हाला फक्त मुलगी द्या; बाकी काही नको” असे मुलाकडील लोक म्हणत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण सध्या मात्र एका मुलाने आपल्या लग्नासाठी विचित्र अटी ठेवल्याची घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय या मुलाने आपण कोणत्या मुलीशी लग्न करणार, याची यादी वाचल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरणं कठीण झालं आहें.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हा मुलगा गुआंगडोंग प्रांतातील शेनझेन शहरातील रहिवासी आहे. मुलाने लग्नाच्या अपेक्षांबाबतची एक यादी तयार केली आहे. जी पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. कारण या मुलाचे म्हणणे आहे की, तो स्वतः चांगलं कमावतो, पण त्याला घर जावई बनायचं आहे. त्याला त्याच्या भावी पत्नीच्या घरात राहायचं आहे.

हेही वाचा- जबरदस्त डील! लाखात नव्हे तर ‘या’ महिलेने केवळ २७० रुपयांमध्ये खरेदी केली ३ घरे, कसं ते जाणून घ्या

रिपोर्टनुसार, हा मुलगा शेनझेन शहरातील एका उद्यानाजवळ हातात बॅनर घेऊन उभा होता. ज्यात लिहिले होते, ‘तो लग्नासाठी वधूच्या शोधात आहे. जी सुंदर, गुणवान आणि घरातील कामे करणारी असेल. यासोबतच ती कमावणारी असावी, तिचा पगार दरमहा किमान १२ हजार युआन म्हणजेच १ लाख ३९ इतका असावा, एवढंच नव्हे तर त्याने पुढे लिहिलं, ‘मुलीजवळ कार आणि बंगला असावा. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नसावे.

हेही पाहा- “परिस्थिती माणसाला…” वादळी वाऱ्यात आईला मदत करण्यासाठी चिमुकल्याची धडपड; हृदयस्पर्शी Video पाहून नेटकरी म्हणाले…

मजेशीर बाब म्हणजे या मुलाने त्याच्या होणाऱ्या बायकोकडून पगाराची जी अपेक्षा ठेवली आहे त्याच्या निम्मी त्याची सध्याची कमाई आहे. त्याचा पगार ६ हजार युआन इतका आहे. शिवाय त्याच्याकडे स्वतःचे घर आणि गाडी देखील नाही. त्यामुळे याच्याकडे काही नसतानाही त्याने लग्नासाठी ठेवलेल्या अटी ऐकल्यानंतर अनेकजण त्याची चेष्टा करत आहेत. शिवाय त्याच्या अपेक्षांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी त्यावर वेगवेगळ्या आणि भन्नाट प्रतक्रिया देत आहेत.

Story img Loader