Google Pune Office Tour : कल्पना करा की तुम्ही ऑफिसमध्ये आहात, दुपारची वेळ आहे, तुम्हाला खूप कंटाळा आलाय आणि काहीतरी खाण्याची इच्छा होतेय. अशावेळी तुम्ही काय करता? एकतर ऑफिसच्या खाली जाऊन थोडं फिरुन येता आणि तिथल्याच जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन खाता. नाहीतर ऑफिसचे कॅन्टीन किंवा ऑनलाईन फूड ऑर्डर असे दोन ऑप्शन असतात. पण ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खाण्यासाठी खूप कमी ऑप्शन असतात, तसेच ऑफिसबाहेर फिरण्यासाठी काही खास जागा नसतात. अशावेळी एका प्रसिद्ध कंपनीने कामाच्या ठिकाणीच आता कर्मचाऱ्यांना खाण्यापिण्यापासून गेमिंग रुम, मसाज चेअर्ससह अनेक सुविधा दिल्या आहेत, या सुविधांची यादी न संपणारी आहे, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटलं असेल, पण होय जगप्रसिद्ध गुगल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पुण्यात असं ऑफिस तयार केलं आहे. जे पाहून तु्म्हीही चाट पडाल. गुगलच्या या नव्या ऑफिसचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुण्यातील गुगलचे हे अप्रतिम ऑफिस पाहिल्यानंतर यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत. या ऑफिसमधील सर्व सुविधा इतक्या हायटेक आहेत ज्या तुम्हीही कधी पाहिल्या नसतील. मात्र हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अगदी आपल्या स्वप्नातील ऑफिस पाहतोय की काय असा अनुभव येतो. गुगलने या ऑफिसमध्ये खाण्या-पिण्यापासून मनोरंजनाच्या सुविधांपर्यंत अनेक गोष्टी दिल्या आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांना शारीरिक आणि मानसिक आरामासाठीच्या सुविधाही यात आहेत.

गुगलने पुण्यातील कोरेगाव पार्क ॲनेक्सी येथे हे नवीन ऑफिस तयार केले आहे. दरम्यान याच गुगल ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर अर्श गोयलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ऑफिसचा एक शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने त्यांच्या ऑफिसची टूर घडवली आहे. ज्यामध्ये त्याने ऑफिसमधील त्याची बसण्याची जागा, कॅफेटेरिया (जेथे विविध खाद्यपदार्थांचे सेक्शन होते), गेमिंग रूम (जिथे कॅरम बोर्ड, टेनिस, बुद्धिबळ आणि इतर खेळ खेळण्याच्या सुविध होत्या.) तसेच आराम करण्यासाठी असलेल्या विविध प्रकारच्या चेअर्स दाखवल्या, हे ऑफिस खूप रंगीबेरंगी दिसत आहे, बीन बॅग, ऑफिस शेयरसह वेगवेगळ्या वातावरणानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या खूर्च्या तिथे आहेत.

गुगलचे हे ऑफिस पाहून तुम्ही व्हाल अवाक्

सॉफ्टवेअर इंजिनिअर अर्श गोयल याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुण्यातील गुगल ऑफिसचा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले की, “नव्याने सुरू झालेले गुगलचे पुणे ऑफिस”.यावर त्याने या ऑफिसमधील कोणती गोष्ट तुम्हाला जास्त आवडली असा प्रश्न युजर्सना विचारला आहे. ज्यावर एकाने लिहिले की, “माझ्या स्वप्नातील ऑफिस”. दुसऱ्या युजरने लिहिले की, “मला ऑफिसमधील प्रत्येक गोष्ट खूप आवडली. कारण सर्वच खूप सुंदर आहे”.

गुगल कंपनीचे प्रत्येक ऑफिस याच सुख-सुविधांसाठी ओळखले जाते. यामुळे गुगलच्या कर्मचाऱ्यांना easy breezy working वातावरण अनुभवता येते. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल आपल्या ग्राहकांना पुणे कार्यालयातून रिअल टाईम टेक्निकल अॅडव्हाइस देते. येथून अॅडवांस इंटरप्राइज क्लाउड टेक्निकवर काम केले जाते.