Viral post: हर एक फ्रेंड कमीना होता है, मगर हर एक फ्रेंड जरुरी भी होता है. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, जी पाहून तुम्हाला धक्का बसेल. ज्यामध्ये बेस्ट फ्रेंडला गर्लफ्रेंड शोधण्यासाठी शहरातील चौकाचौकात तरुणीने होर्डिंग लावले आहेत. मित्रांशिवाय जीवनात रस नाही. बेरंग जीवनात फक्त मित्रच रंग भरतात. मग ते सुख असो वा दु:खाचा काळ असो. मित्र नेहमी त्याच्या मित्रासाठी उभा असतो. होर्डिंगमध्ये एका मुलीने आपल्या मित्रासाठी प्रेयसीचा शोध घेतल्याचा उल्लेख आहे. रिओ असे या मुलाचे नाव असून त्याच्यासाठी मैत्रीण शोधण्याची जबाबदारी त्याची जिवलग मैत्रीण आंचल हिने उचलली आहे. आंचलने रस्त्याच्या कडेला एक मोठे होर्डिंग लावले आहे. ज्यामध्ये ती तिच्या मित्र रिओसाठी गर्लफ्रेंड शोधत असल्याचे लिहिले आहे.
आंचलने होर्डिंगमध्ये तिचा मित्र रिओचा फोटोही लावला आहे. त्यानंतर रिओवर कौतुकाचा वर्षाव झाला. मित्राचं कौतुक करताना आंचलने लिहिले आहे की, रिओला शहरातील सर्वोत्तम पाणीपुरीची दुकानं माहिती आहेत. तसेच तो एक चांगला फोटोग्राफर देखील आहे. जी कोणी त्याची गर्लफ्रेंड होईल, तिचे असंख्य कॅन्डीड फोटो काढले जातील. याशिवाय पार्क स्ट्रीटमध्ये मिळणाऱ्या काठी रोल्सही तो स्वतःच्या हाताने बनवतो. आंचलने होर्डिंगमध्ये रिओच्या टिंडर खात्याचा क्यूआर कोड देखील शेअर केला आहे.
पाहा पोस्ट
हेही वाचा >> VIDEO: माणुसकी! पाच लाखांच्या गर्दीतही मिळाली रुग्णवाहिकेला वाट; अभूतपूर्व क्षण
ही पोस्ट ig_calcutta नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. ज्याला अनेक लोकांनी शेअर केले आहे आणि सुमारे ४ हजार वेळा लाईक केले आहे. पोस्टवर लोक आपापल्या प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले…रिओ तू कुठे आहेस, मी तुला शोधत आहे. दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… रिओ कुठे आहेस. तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, जगात वेड्या लोकांची कमी नाही.
आजकाल लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात. लोक फोटो, व्हिडीओ बनवत ते इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. यामध्ये लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत.