Wari Viral Video : आषाढी एकादशी नुकतीच पार पडली. गेल्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर वारीतले अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एका वारकरी असलेल्या आजी आजोबांचा गोंडस व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हे वारकरी असलेले आजी आजोबा नृत्य करताना दिसत आहे. एवढंच काय तर आजोबांनी चक्क आजीला कडेवर उचलले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की वारकरी असलेले दोन आजोबा विठ्ठलाचे भजनामध्ये तल्लीन होऊन नृत्य करत आहे. व्हिडीओत दिसेल की आजोबा आजीला कडेवर उचलून नृत्य करत आहे त्यानंतर आजी आजोबांबरोबर नृत्य करते. विशेष म्हणजे नृत्य करताना आजी डोक्यावरचा पदर खाली पडू देत नाही. व्हिडीओच्या शेवटी आजीबाई रखुमाईसारखी उभी असलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
हेही वाचा : ‘गोड तुझे रूप…’ छोट्या गोंडस वारकऱ्याचा व्हिडीओ पाहिला का?
@AjayG_Speaks या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “रखुमाई..जेव्हा ती आजी डोक्यावर पदर घेते”
या व्हिडीओवर “तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना” हे अप्रतिम गाणे लावले आहे. हा व्हिडीओ खुप सुंदर शुट करण्यात आला आहे.
हेही वाचा : संतापजनक! दोन महिलांनी तरुणीला मारल्या लाथा, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी आले. आपल्या संस्कृतीमध्ये निरागसपणे हरवताना..” तर दुसऱ्या एका युजने लिहिले आहे, “एक गोष्ट लक्षात आली का ? या वयातही आजीचा उत्साहामध्ये थोडाही फरक पडलेला दिसत नाही, अगदी ३० वर्षांच्या मुलीप्रमाणे आनंद व्यक्त करत आहेत. किती उत्साह, किती आनंद. किती प्रेम आणि किती कुतूहल त्या विठ्ठला वर, जयहरी विठ्ठल” आणखी एका युजरने लिहिले आहे, “संस्कृती आणि परंपरा जपणारी ही माणसं खूपच श्रीमंत आहेत.आत्ताच्या आधुनिकपणाचा खूप अतिरेक होतोय.”