Viral Video : सोशल मीडियावर वारकरऱ्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.कधी ज्ञानोबा माऊली म्हणताना तर कधी टाळ मृदुंग वाजवताना त्यांचे व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. दरवर्षी हजारो वारकरी कार्तिक आणि आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायी जातात. ही पायी वारी जगभरात प्रसिद्ध आहे. वारकरी भजन किर्तनाच्या माध्यमातून विठ्ठलाची भक्ती करताना दिसून येतात. लहानांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक जण वारकरीच्या रुपात दिसून येतात. वारकरीच्या रुपात ही लोकं सर्व विसरुन विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होताना दिसून येतात. त्यांच्या चेहऱ्यावरील तेज आणि आनंद पाहून कोणीहीह थक्क होईल. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकले वारकरी टाळ मृदुंगाच्या तालावर थिकरताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ भव्य किर्तन महोत्सवातील आहे.या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की चिमुकले टाळ मृदुंगाच्या तालावर थिरकताना दिसत आहे.ज्ञानोबा माऊलीच्या गजरात ते रंगलेले दिसत आहे. या चिमुकल्यांनी सुंदर पांढरा पोशाख घातला आहे. कपाळावर टिळा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातली आहे. त्यांचा पेहराव अत्यंत आकर्षक दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला एक मोठे बॅनल लावलेले दिसत आहे. त्या बॅनरवरुन कळते की हा व्हिडीओ पंढरपूरच्या जवळ असलेल्या दिघी गावातील आहे. या गावात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्या दरम्यान किर्तन महोत्सवातील हा व्हिडीओ आहे.
हेही वाचा : चहा चुकूनही उतू जाणार नाही, हा सोपा अन् भन्नाट जुगाड एकदा पाहाच
purushottam_dada_patil या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आनंद,आनंद,परमानंद राम कृष्ण हर ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ज्ञानोबा माऊली तुकाराम” तर एका युजरने लिहिलेय, “जो आनंद माऊलीचे नाव घेऊन होतो तो कुठेच नाही” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा आनंद कुठेही मिळत नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर रामकृष्ण हरी