Viral Video : येत्या २९ जूनला आषाढी एकादशी आहे. त्यानिमित्त महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत. वारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये वारकरी आणि डॉक्टर यांच्यातील मजेशीर संवाद दिसून येत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला डॉक्टर मुली आणि वारकरी दिसतील. या डॉक्टर असलेल्या मुली वारकऱ्याच्या पायावरील दुखापतीवर मलमपट्टी करताना दिसत आहेत. त्यादरम्यान त्यांच्यातील संवाद सध्या व्हायरल होत आहे …
हेही वाचा : Optical Illusion : दिसतं तसं नसतं! मुलीचं अर्ध शरीर पाहून तुम्ही गोंधळून जाऊ नका, आधी फोटो नीट पाहा
पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, या वारकऱ्याला डॉक्टर विचारतात, डॉग म्हणजे काय? त्यावर भोळे वारकरी म्हणतात की डॉग म्हणजे डॉक्टर. वारकऱ्याचा हा भोळेपणा पाहून सर्व डॉक्टरांना हसू येते. पुढे त्यातीलच एक डॉक्टर सांगते की, डॉग म्हणजे कुत्रा. त्यानंतर वारकरी हसत हसत म्हणतात की, डॉग म्हणजे कुत्रा होय. सध्या हा गोड संवाद सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
raja_pandhari_cha या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओवर युजर्सनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया लिहिल्या आहेत. अनेक युजर्सनी वारकऱ्याचा भोळेपणा पाहून ‘राम कृष्ण हरी’ असे लिहिले आहे.