घरात लहान मुलं असेल तर घर भरल्यासारखं वाटतं. पण लहान मुलांबरोबर खेळण्याची, मज्जा मस्ती करण्याची मज्जा काही वेगळीच असते. पण नुसती मज्जा मस्ती करून चालत नाही, लहान मुल घरात असेल तर त्याची खूप काळजी घ्यावी लागते. डोळ्यात तेल घालून लहान मुलांवर लक्ष ठेवावे लागते कारण नजर हटेपर्यंत मुलं काही ना काही उद्योग करतात.
लहान मुल अत्यंत चंचल असतात. त्यांना सतत काहीतरी नवीन जाणून घेण्याच्या उत्सूकता असते त्यामुळे ते नेहमी नव नवीन गोष्टीकडे आकर्षित होतात. त्यामुळे दिसेल ती वस्तू ते उचलून तोंडात टाकतात. कोणती वस्तू खाल्ली पाहिजे आणि कोणती नाही याची समज त्यांना नसते. अशा परिस्थितीमध्ये पालकांना आणि घरातील प्रत्येकालाच नेहमी सजग राहावे लागते. कारण मुलांकडे जरा दुर्लक्ष्य झाले तर मुलं एखादी वस्तू तोंडात टाकतात अन् घशात अडकू शकते ज्यामुळे त्यांच्या जीवावर बेतू शकते. तसेच कोणतेही वस्तू ज्यामुळे लहान मुलांना दुखापत होऊ शकते अशा वस्तू त्यांच्यापासून लांब ठेवल्या पाहिजे. अगदी मोबाईलचा चार्जरही.
अनेकदा लोकांना सवय असते की मोबाईल चार्ज झाला की चार्जर तसाच इलेक्ट्रिक बोर्ड लावलेला असतो आणि स्विच देखील चालूच ठेवतात आणि निघून जातात ज्यामुळे चार्जरच्या वायरमध्ये विजेचा प्रवाह सुरू असतो. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या लहान मुलांने चार्जरच्या वायरला हात लावला किंवा वायर तोंडात टाकली तर त्यांना विजेचा झटका बसू शकतो जे अत्यंत धोकादायक आहे. तुम्हीही अशी चूक करत असाल तर आताच सवय बदल.
चिमुकल्याने तोंडात टाकली चार्जरची वायर अन्
सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे एक लहान बाळ खेळत आहे. त्याच्याजवळ मोबाईलचा चार्जर चार्जिंगसाठी लावला आहे. खेळता खेळतो ते चार्जरचे टोक तोंडात टाकतो ज्यामुळे त्याला अचानक हलकासा झटका बसतो असते दिसते आणि तो घाबरून रडू लागतो. दरम्यान हा सर्व त्याच्या जवळ असलेली व्यक्ती बहुदा त्याचे पालक मोबाईलमध्ये शुट करत आहे. व्हिडीओसाठी लेकराचा जीव धोक्यात टाकल्याचे पाहून नेटकऱ्यांना पालकांवर रोष व्यक केला आहे.
व्हिडीओसाठी चिमुकल्याबरोबर पालकांनी जे केले ते पाहून नेटकऱ्यांचा संताप
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर rupesh__patel__1008 नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वर कमेंट करत अनेकांनी पालकांवर टिका केली.
एकाने कमेंट केली की,”व्हिडिओ बनवत कोण आहे, शॉक बसण्याची वाट पाहात आहेत का हे लोक”
दुसऱ्याने कमेंट केली की, “मुलाला शॉक नाही लागला, जो व्हिडिओ शूट करत आहे त्यांना मुलांला अचानक घाबरवले आहे.”
तिसऱ्याने कमेंट की, “जो व्हिडिओ बनवत आहे त्याला माहित आहे की त्या वायरमध्ये करंट आहे तरी व्हिडिओ कसा शुट केला. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.”
चौथ्याने कमेंट केली, “शॉक नाही लागला बाळाला, त्याच्यावर ओरडल्याने तो घाबरून रडला आहे.”
पाचव्याने कमेंट केली की, “तू हा व्हिडिओ बनवणारा वेडा माणूस आहेस. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.”
सहाव्याने कमेंट केली,”आजकाल पालक पैसे कमविण्यासाठी मुलांच्या जीवाशी खेळत आहेत.”
व्हायरल व्हिडीओची सत्यता पडतण्यात आली नाही तरी पालकांनी चार्जर किंवा इलेक्ट्रिक वस्तू लहान मुलांच्या आसपास वापरताना योग्य काळजी घेतली पाहिजे.